मांडवी : आदिवासी विद्या संकुलातील विद्यार्थिनी मृत्यू प्रकरणी कार्यवाहीचे स्वरूप उघड न झाल्याने आदिवासी पालक वर्गात संभ्रम निर्माण झाला़ परिणामी तब्बल पाचव्या दिवशी या विद्यासंकुलात विद्यार्थ्यांविना शुकशुकाट झाला आहे़संधी निकेतन संस्थेच्या पिंपळगाव येथील आदिवासी मुलीच्या शैक्षणिक संकुलात रविवारी २० जुलैला सुवर्णा आतराम( रा़ कनकी) या मुलीचा मृत्यू झाला़ संस्थेच्या निष्काळजीपणातून एका विद्यार्थिनीचा जीव गेला़ या प्रकरणी दोषीवर करण्यात आलेल्या कार्यवाहीचे स्वरूप उघड झाले नाही़ चौकशी अहवाल गुलदस्त्यात आहे़ घाबरलेल्या शालेय मुलींना भक्कम असा आधार देण्यास जबाबदार असणारे घटक पुढे येताना दिसत नाही़ परिणामी पाच दिवसानंतरही या संकुलात शुकशुकाट आहे़ शिक्षणाच्या नावाखाली आदिवासी पालकांची दिशाभूल करून मुलींचे शैक्षणिक नुकसान करणाऱ्या संस्थेवर कार्यवाही करण्याची मागणी सरपंच विकास कुडमुते, उपसरपंच मनोज बम्पलवार, पं़ स़ सदस्य आश्विनी भावराव शेडमाके, किसन मडावी, सुदर्शन मेसराम यांनी केली़ सदर शाळेत मुख्याध्यापक, संस्थाचालक, शिक्षक हे घटक हजर नसल्याने पोलिस जाब-जवाब घेण्याकामी अडचण येत असल्याची माहिती बीट जमादार अनिस पठाण यांनी दिली़ (वार्ताहर)
आदिवासी विद्या संकुलाला पाचव्या दिवशीही कुलूप
By admin | Updated: July 25, 2014 00:31 IST