शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत टाइम्स फूड फेस्टिव्हल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 00:13 IST

लोकमत टाइम्स फूड फेस्टिव्हलचे १९ ते २१ जानेवारीदरम्यान शहरात आयोजन करण्यात आले आहे. याद्वारे देशभरातील प्रसिद्ध खाद्यपदार्थांचा खवय्यांना आस्वाद घेता येणार आहे. त्याचबरोबर विविध राज्यांतील लोकनृत्यांचाही आनंद लुटता येणार आहे. यामुळे तीन दिवस शहरवासीयांसाठी ही पर्वणीच ठरणार आहे.

ठळक मुद्देपर्वणी : दहा राज्यांतील कलावंत सादर करणार लोकनृत्य

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : लोकमत टाइम्स फूड फेस्टिव्हलचे १९ ते २१ जानेवारीदरम्यान शहरात आयोजन करण्यात आले आहे. याद्वारे देशभरातील प्रसिद्ध खाद्यपदार्थांचा खवय्यांना आस्वाद घेता येणार आहे. त्याचबरोबर विविध राज्यांतील लोकनृत्यांचाही आनंद लुटता येणार आहे. यामुळे तीन दिवस शहरवासीयांसाठी ही पर्वणीच ठरणार आहे.लोकमत टाइम्स फूड फेस्टिव्हलबद्दल शहरवासीयांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. कधी एकदा फेस्टिव्हल सुरू होतो आणि आम्ही विविध लज्जतदार पदार्थांवर ताव मारतो, अशी तीव्र इच्छा खवय्यांमध्ये निर्माण झाली आहे. या फूड फेस्टिव्हलचा आनंद आणखी द्विगुणित करण्यासाठी आयोजकांनी विविध राज्यांतील लोकनृत्य कलाकारांनाही आमंत्रित केले आहे. यामुळे आता प्रत्येक राज्यातील नावीन्यपूर्ण खमंग, चटपटीत खाद्यपदार्थांची चव चाखत असताना दुसरीकडे त्या-त्या राज्यांतील लोकनृत्यही पाहण्यास मिळणार आहे. शहरवासीयांसाठी हा दुर्मिळ दुग्धशर्करा योगच म्हणावा लागेल.यासंदर्भात फूड फेस्टिव्हलच्या आयोजिका आशू दर्डा यांनी सांगितले की, देशातील प्रत्येक राज्यात आपली खाद्यसंस्कृती, लोककलेची महान परंपरा आहे. खास शहरातील खवय्यांसाठी या विविध राज्यांतील लोकप्रिय शाकाहारी पदार्थांचा आस्वाद एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच त्या राज्यातील लोकसंगीत, लोकनृत्य तेथील विशिष्ट पारंपरिक वेशभूषा, तसेच त्या भूमीचे वैशिष्ट्ये काय आहे, याची माहिती खवय्यांना याच प्रदर्शनात मिळणार आहे. प्रत्येक राज्यातील खाद्यपदार्थ व तेथील लोकसंगीत व लोकनृत्य, यामुळे आपण प्रत्यक्षात त्या राज्यातच आलो की काय, असा भास शहरवासीयांना होईल, असे नियोजन फेस्टिव्हलमध्ये करण्यात येत आहे.तसेच वेगवेगळ्या राज्यांतील शेफलाही यानिमित्ताने खास आमंत्रित करण्यात आले आहे. यामुळे त्या राज्यातील अस्सल खाद्यपदार्थाची चव खवय्यांना मिळेलच. शिवाय आवडीनुसार वेगवेगळ्या लोकनृत्याचा आनंदही घेता येणार आहे.वेगवेगळ्या राज्यांतील कलावंतांना आमंत्रित करण्यासाठी ज्यांनी आयोजकांची मदत केली ते राजेश पटेल यांनी सांगितले की, फूड फेस्टिव्हलच्या निमित्ताने पहिल्यांदाच शहरात वेगवेगळ्या राज्यांतील लोककलावंत येत आहेत. यात गुजरातचे गोफ नृत्य, पंजाबचा भांगडा, राजस्थानचे अग्नी भवई नृत्य आदी नृत्य प्रकारांचा समावेश असणार आहे.300खाद्यपदार्थांची मेजवानीलोकमत टाइम्स फूड फेस्टिव्हल क्रांतीचौक येथील मनोर हॉटेलच्या लॉनवर होणार आहे. यात वेगवेगळ्या राज्यांतील ३०० खाद्यपदार्थांचा आस्वाद तेही एकाच छताखाली घेता येणार आहे. औरंगाबादच नव्हे तर आसपासच्या जिल्ह्यातील खाद्यप्रेमींसाठी फेस्टिव्हल पर्वणी ठरणार आहे.