बीड : शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी बुधवारी ‘लोकमत’च्या वतीने ‘एक विद्यार्थी, एक झाड’ हा पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात आला. याअंतर्गत शहरातील विविध शाळांमध्ये जाऊन ‘लोकमत’ टीमने विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा देत रोपे भेट दिली.शहरातील काझीनगर भागातील आझाद हिंद उर्दू व सेमी इंग्रजी शाळेत आयोजित कार्यक्रमप्रसंगी संस्था सचिव शेख मुसा, जलील पठाण, मुख्याध्यापक बसीर काझी उपस्थित होते. यावेळी ‘लोकमत’च्या वतीने विद्यार्थ्यांना रोपे भेट देऊन त्याचे संगोपन करण्याची जबाबदारही त्यांच्यावर सोपवली. मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी वृक्षारोपणासाठी लोकमतने पुढाकार घेऊन पर्यावरण रक्षणाचा संदेश दिल्याने या उपक्रमाचे कौतुक झाले. यावेळी सय्यद आवेज, शेख अय्याज, कुमारी यास्मीन, मोमीन सबा, शेख फैसल, सय्यद रज्जाक, मोमीन अनिसा व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन शेख मुदस्सीर यांनी केले. आभार मुख्याध्यापक बसीर काझी यांनी मानले.श्री शिवाजी विद्यालयात झालेल्या कार्यक्रमास मुख्याध्यापक एम. एस. काकडे, प्रशासक बाळासाहेब जगदाळे, उपमुख्याध्यापक आर. आर. वाघमारे, उपमुख्याध्यापक जी. डी. टेकाळे, एनसीसी प्रमुख जगदीश करपे, एच. आर. सावंत, आर. एल. कदम, विनोद डंबरे, गिरीश चाळक, शैलेश मोरे, सुरेश सोनटक्के, संदीप शेटे, विक्रम आमटे, गुरुलिंग शेटे, अशोक परांडकर, बाळासाहेब कांबळे आदी उपस्थित होते. ‘लोकमत’ने उपलब्ध केलेल्या रोपांचे यावेळी विद्यार्थ्यांच्या हस्ते रोपण करण्यात आले. सूत्रसंचालन अजय चव्हाण यांनी केले.किड्झी इंग्लिश स्कूलमध्ये देखील लोकमततर्फे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी संस्थासंचालक गणेश मैड, शीतल मैड यांच्यासह शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
‘लोकमत’चा ‘एक विद्यार्थी, एक झाड’ उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2016 00:11 IST