शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत इम्पॅक्ट : संपूर्ण ‘स्ट्रिप’ची सक्ती करणाऱ्यांना नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 16:47 IST

पूर्वी सक्ती करणारे आता देत आहेत स्ट्रिप कापून टॅबलेटस्, रुग्ण, नातेवाईकांचा अनुभव

औरंगाबाद : औषधी गोळ्यांची संपूर्ण ‘स्ट्रिप’ रुग्णांच्या माथी मारणाऱ्या औषधी दुकानांना अन्न व औषधी प्रशासनाने कारणे दाखवा नोटिसा काढल्या आहेत. या कारवाईमुळे ‘स्ट्रिप’ची सक्ती करणाऱ्या औषध विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे. परिणामी पूर्वी सक्ती करणारे ‘स्ट्रिप’ कापून टॅबलेटस् देत असल्याचा अनुभव रुग्ण, नातेवाईक आणि ग्राहकांना येत आहे. 

शहरातील औषधी दुकानांवर दहा गोळ्यांची संपूर्ण स्ट्रिप माथी मारण्याचा धक्कादायक प्रकार सुरू असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून समोर आणले. याविषयी २५ एप्रिल रोजी ‘रुग्णांच्या माथी टॅबलेटस्ची संपूर्ण स्ट्रिप’ या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रकाशित करण्यात आले. ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशनमधून पडताळणी केली, तेव्हा सर्वसामान्यांना अनेक औषधी दुकानांवर आर्थिक भुर्दंड सहन करून संपूर्ण स्ट्रिप घ्यावी लागत असल्याचे समोर आले. डॉक्टरांनी सहा गोळ्या लिहिलेल्या असताना दहा गोळ्यांची स्ट्रिप घेण्याची सक्ती काही ठिकाणी करण्यात आली. या प्रकाराविषयी सर्वसामान्यांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. अशाप्रकारे स्ट्रिपची सक्ती करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी रुग्ण, नातेवाईक आणि सर्वसामान्यांकडून करण्यात आली.

औषधी आणि सौंदर्यप्रसाधने नियम १९४५ मधील ६५(९) या तरतुदीनुसार, रुग्णाला औषधी दुकानातून वितरित करायच्या औषधांबाबत स्पष्टपणे निर्देश आहेत. त्यानुसार रुग्णाने सहा गोळ्या मागितल्या, तर त्याला दहा गोळ्यांची संपूर्ण स्ट्रिप देण्याची आवश्यकता नाही. तरीही अनेक औषध दुकानदारांकडून त्याकडे दुर्लक्ष करून संपूर्ण स्ट्रिपची सक्ती क रण्यात येत असल्याचे समोर आले. या प्रकाराची गंभीर दखल घेत अन्न औषधी प्रशासनाने स्ट्रिपची सक्ती करणाऱ्यांची तपासणी केली. ‘लोकमत’ने केलेल्या पडताळणीत स्ट्रिपची सक्ती करणाऱ्या औषधी दुकानांना अखेर कारणे दाखवा नोटिसा काढण्यात आल्या आहेत. सात दिवसांत त्यांच्याकडून उत्तरे प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे औषधी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. संपूर्ण स्ट्रिपच्या सक्तीविषयी सर्वसामान्य रुग्ण, नातेवाईक, ग्राहक यांच्यासह विधितज्ज्ञ, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, डॉक्टरांनी नाराजी व्यक्त केली. हा प्रकार थांबण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले. अनेक औषधी विक्रेत्यांनीही नाराजी व्यक्त केली. प्रत्येक विक्रेता सक्ती करीत नाही,असे काहींनी म्हटले.

पूर्वी नकार देत, पण आता देतातउपचारासाठी दर महिन्याला डॉक्टरांकडे जावे लागते. डॉक्टर महिनाभराच्या गोळ्या लिहून देतात. पैशांमुळे पूर्वी अर्ध्या गोळ्या द्या म्हटल्यावर औषधी दुकानदार नकार देत असे. स्ट्रिप कापता येत नाही, असे सांगून टाळत असे. त्यामुळे पूर्ण गोळ्या घ्याव्या लागत होत्या; परंतु दोन दिवसांपूर्वी पुन्हा अर्ध्या गोळ्या द्या म्हटल्यावर तात्काळ गोळ्या दिल्याचे एका महिलेने ‘लोकमत’ प्रतिनिधीला सांगितले. असाच अनुभव अनेकांना येत आहे. 

नोटिसा आणि इतरांना सूचना‘लोकमत’ने पडताळणी केलेल्या दोन औषधी दुकानांना नोटिसा काढण्यात आल्या आहेत. एकाची अजून चौकशी सुरूआहे. नोटीस काढलेल्यांना सात दिवसांत उत्तर द्यावे लागणार आहे. स्ट्रिपच्या सक्तीसंदर्भात नियमित तपासणी केली जात असते. यापुढेही औषधी दुकानांना यासंदर्भात सूचना केल्या जातील.- संजय काळे, सहआयुक्त, औषध प्रशासन