शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

लोकमत ‘दसरा-दिवाळी शॉपिंग उत्सव : दीप्ती मंगरूळकर ठरली ५ तोळे सोन्याची विजेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 01:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : दसरा-दिवाळीतील खरेदीचा उत्साह वाढविण्यासाठी व ग्राहकांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित दसरा-दिवाळी शॉपिंग उत्सवाची बम्पर बक्षीस ...

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : दसरा-दिवाळीतील खरेदीचा उत्साह वाढविण्यासाठी व ग्राहकांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित दसरा-दिवाळी शॉपिंग उत्सवाची बम्पर बक्षीस सोडत मंगळवारी जाहीर झाली आहे. यात पहिले बम्पर बक्षीस ५ तोळे सोन्याची भाग्यवान विजेती दीप्ती मंगरूळकर ठरली आहे.लोकमतच्या वतीने मागील १३ वर्षांपासून दसरा-दिवाळी शॉपिंग उत्सव घेण्यात येत असतो. दरवर्षी या उत्सवात सहभागी होणाºया शहरातील विविध दालनातून खरेदी करणाºया ग्राहकांना कूपन दिल्या जाते. सर्व कूपन एकत्रित करून दसरा-दिवाळीदरम्यान दररोज सोडत काढण्यात येतेच शिवाय बम्पर बक्षीस सोडतही जाहीर करण्यात येते. यावेळी दसरा उत्सव २८ ते ३० सप्टेंबर व दिवाळी उत्सव १३ ते १७ आॅक्टोबर २०१७ रोजी घेण्यात आला. मंगळवारी लोकमत येथील एसी हॉलमध्ये सोडत काढण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी कमलनयन बजाज रुग्णालयातील कॅन्सर सर्जन डॉ. राजेश सावजी, श्री चेस्ट क्लिनिकचे क्षय व छाती विकारतज्ज्ञ डॉ. श्रीकांत सहस्रबुद्धे तसेच धवल मिश्रीकोटकर, बालाजी इलेक्ट्रॉनिक अँड फर्निचरचे नागनाथ मुत्तेपवार व लॅपटॉप बाजारचे प्रमोद डेरे, ग्रीनसेन्स एनर्जी सिस्टीमचे सुभाष चांदणे या मान्यवरांच्या हस्ते सोडत जाहीर करण्यात आली. पहिले बम्पर बक्षिसाची भाग्यवान विजेती दीप्ती मंगरूळकर (कूपन नं. ००८६६७) हिने मछली खडक येथील ‘श्री रतनलाल मोतीलाल’ या होलसेलच्या दुकानातून साहित्य खरेदी केले होते. मछली खडक रोडवरील उत्तम मिठाईगृहातून मिठाई खरेदी करणारे विशाल भोंडे (कूपन नं. १०२९२०) यांना होंडा अ‍ॅक्टिव्हा हे द्वितीय बम्पर बक्षीस लागले आहे. हडको टीव्ही सेंटर येथील प्राची आॅटो स्पेअर्स येथून स्पेअरपार्ट खरेदी करणारे फय्याज शेख (कूपन नं. ००६५४२) तृतीय बक्षिसाचे विजेते ठरले. त्यांना ‘ग्रीन सेन्स’चे सोलार वॉटर हिटर देण्यात येणार आहे. चौथे बक्षीस एलईडी टीव्हीचे मानकरी सतीश पांढरे (कूपन नं. ३०६३६२) ठरले आहेत. त्यांनी जवाहर कॉलनी येथील अमर एनएक्समधून खरेदी केली होती, तर पाचवे बक्षीस लॅपटॉप अब्दुल रशीद (कूपन नं. ३०५४८७) यांनी जिंकले आहे. त्यांनी सराफा रोड येथील संजय दि. सावखेडकर ज्वेलर्स येथून सोने खरेदी केले होते. याशिवाय दसरा-दिवाळीदरम्यान ८ दिवस दररोज सोडतीद्वारे ८१ बक्षिसे काढण्यात आली. त्यात एकूण ६५३ विजेत्यांना बक्षीस देण्यात आले. पहिल्या बंपर बक्षिसाचे प्रायोजक राजुरी स्टील, दुसरे बक्षिसाचे प्रायोजक अरिहंत होंडा, तिसºया बक्षिसाचे प्रायोजक ग्रीन सेन्स, चौथ्या बक्षिसाचे प्रायोजक बालाजी फर्निचर व इलेक्ट्रॉनिक्स, तर पाचव्या बक्षिसाचे प्रायोजक लॅपटॉप बाजार हे आहेत.संपूर्णपणे पारदर्शक सोडतसातत्याने नवनवीन बदल स्वीकारणारे आणि ग्रामीण भागापासून ते जागतिकस्तरापर्यंतच्या ताज्या बातम्या देणाºया लोकमतने वाचकांच्या हृदयात स्थान मिळविले आहे. दसरा-दिवाळीत सर्वजण नवीन खरेदी करीत असतात. अशा ग्राहकांना खरेदीत प्रोत्साहन मिळावे व व्यापाºयांची व्यवसायात वृद्धी व्हावी, यासाठी दरवर्षी लोकमत दसरा-दिवाळी शॉपिंग उत्सव साजरा करीत असतो. मंगळवारी मी बंपर सोडत काढण्याच्या सोहळ्याचा साक्षीदार ठरलो. पहिले भाग्यवान बंपर बक्षीस माझ्या हातून काढण्यात आले. या शॉपिंग उत्सवातील सोडत काढण्याची प्रक्रिया संपूर्णपणे पारदर्शक होती. याच पारदर्शक प्रक्रियेमुळे लोकमतने वाचकांचा विश्वास ंिजंकला आहे. यामुळे दरवर्षी या उत्सवाला प्रचंड प्रतिसाद मिळतो.-डॉ. राजेश सावजीकॅन्सर सर्जननेहमी ‘लोकमत’सोबत राहूमागील १३ वर्षांपासून लोकमत दसरा-दिवाळी शॉपिंग उत्सव साजरा करीत आहे. यामुळे जशी ग्राहकांना बक्षीस जिंकण्याची संधी उपलब्ध होते त्याचप्रमाणे व्यावसायिकांचा व्यवसायही वृद्धिंगत होत आहे. या उत्सवानिमित्त ग्राहक व व्यावसायिकांमधील नाते आणखी घनिष्ठ झाले आहे. हा मोठा फायदा यातून व्यावसायिकांना होत आहे. प्रायोजक म्हणूनही आम्हाला या शॉपिंग उत्सवाचा फायदा झाला आहे. यापुढेही आम्ही लोकमतच्या विविध उपक्रमांत प्रायोजक म्हणून सहभागी होत राहू.-धवल मिश्रीकोटकर,अरिहंत मोटर्सविश्वासच बसत नाहीसायंकाळी ४.३० ते ५ वाजेदरम्यान मला लोकमतमधून फोन आला की, तुला दसरा-दिवाळी बंपर सोडतचे पहिले बक्षीस लागले आहे. यावर माझा विश्वास बसला नाही. नंतर मात्र खात्री पटली. आनंदा एवढा झाला की मला आभाळ ठेंगणे वाटू लागले. याची प्रचीती तेव्हा आली. मी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. माझे वडील जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सनमध्ये कामाला आहेत, तर आई जिल्हा परिषदेत शिक्षिका आहे. लगेच फोन करून आई-वडिलांना माहिती दिली.-दीप्ती मंगरूळकर,५ तोळे सोन्याची भाग्यवान विजेत्या