शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

गणेश मंडळांसाठी लोकमान्य महोत्सव

By admin | Updated: August 19, 2016 00:57 IST

जालना : या वर्षीचा गणेशोत्सव शासनाच्यावतीने लोकमान्य महोत्सव व सार्वजनिक गणेशोत्सव अभियान लोकमान्य टिळकांच्या संकल्पनेतून साजरा करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

जालना : या वर्षीचा गणेशोत्सव शासनाच्यावतीने लोकमान्य महोत्सव व सार्वजनिक गणेशोत्सव अभियान लोकमान्य टिळकांच्या संकल्पनेतून साजरा करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या महोत्सवात सहभाग घेणाऱ्या मंडळांना शासनाच्यावतीने तालुका ते राज्य पातळीवर रोख रक्कम व प्रमाणपत्र दिले जाणार असल्याचे माहिती राज्य महोत्सव समितीचे सदस्य बसवराज मंगरूळे यांनी दिली.या महोत्सवाची माहिती देण्यासाठी जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची व पोलिस अधिकाऱ्यांची बैठक गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. त्याप्रसंगी त्यांनी ही माहिती दिली.बैठकीस जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश इतवारे, पोलीस उपअधीक्षक (गृह) अभय देशपांडे प्रमुख उपस्थित होते. मंगरूळे म्हणाले की, या वर्षीच्या गणेशोत्सवात जिल्ह्यातील गणेश मंडळांनी सहभागी होत असताना शासनाच्या लोकमान्य महोत्सवात सहभाग नोंदवावा. या महोत्सवात स्वदेशी, साक्षरता अभियान, बेटी बचाओ बेटी पढाओ, व्यसनमुक्ती, जलसंधारण या पाच विषयावर देखावे सादर करावेत. उत्कृष्ट ठरणाऱ्या गणेश मंडळांच्या देखाव्यांना तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर बक्षीस देण्यात येणार आहेत. जिल्हास्तरावर प्रथम बक्षीस १ लाख रूपये, दुसरे ७५ हजार तर तिसरे ५० हजार एवढे असणार असून तालुकास्तरावरील प्रथम बिक्षस २५ हजार, दुसरे १५ हजार व तृतीय बिक्षस १० हजार रूपये दिले जाणार असल्याची माहितीही त्यांनी या बैठकीत दिली. या कामी विविध विभागाबरोबरच शिक्षण विभागाने हे अभियान यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी २६ आॅगस्टपूर्वी आपले आवेदनपत्र दाखल करणे आवश्यक असल्याचेही मंगरुळे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)