शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : शांतीगिरी महाराज वाढविणार समीकरणाचा गुंता 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 21:05 IST

औरंगाबादेतून लढण्याबाबत भक्तांनी ग्रीन सिग्नल दिल्यामुळे केली तयारी

ठळक मुद्देमहाराजांनी अर्ज नेल्याने चर्चेला उधाण वर्षभरापासून मठात नेत्यांची हजेरी 

- विकास राऊत  

औरंगाबाद : वेरूळच्या जनार्दन स्वामी मठाचे मठाधिपती महामंडलेश्वर शांतीगिरी मौनगिरी महाराज यांनी लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरण्यासाठी तयारी केल्याची शक्यता आहे. त्यांनी शुक्रवारी निवडणुकीच्या अनुषंगाने दोन उमेदवारी अर्ज घेतले असून, भक्तांनी औरंगाबाद लोकसभा निवडणूक लढण्यासाठी संकेत दिल्यामुळे त्यांनी तयारी सुरू केल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या प्रवेशामुळे राजकीय समीकरणाचा गुंता वाढणार आहे. त्यांनी अर्ज नेल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे, ते अर्ज दाखल करतील आणि निवडणूक लढवतील, त्यावेळीच खरे चित्र स्पष्ट होईल. 

शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार खा. चंद्रकांत खैरे, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार आ. सुभाष झांबड, अपक्ष उमेदवार आ. हर्षवर्धन जाधव, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आ. इम्तियाज जलील आणि शांतीगिरी महाराज यांच्यासह सुभाष पाटील यावेळी निवडणूक मैदानात राहतील, असे दिसते. भाजपासोबत शिवसेनेचे मनोमिलन झाले असले तरी माजी खा. जयसिंगराव गायकवाड यांनी देखील उमेदवार अर्ज नेला आहे. 

सुभाष पाटील यांनी २००९ मध्ये मनसेकडून लोकसभा निवडणुक लढविली होती. त्यांनी १७ हजार २६ मते घेतली होती. ही मते त्यांना कन्नड आणि शहरातून मिळाली होती. शिवसेनेच्याच उमेदवाराची मते त्यांनी घेतली. तर शांतीगिरी महाराज यांनी १ लाख ४८ हजार २६ मते घेत काँग्रेसला पराभवाकडे नेले तर शिवसेनेचे मताधिक्य कमी केले. यावेळी शांतगिरी महाराजांनी जर निवडणुक मैदानात उतरण्याचे निश्चित केले तर मतदानाच्या गोळाबेरीजचा मोठा गुंता होईल. कन्नड, गंगापूर आणि वैजापूर या तीन विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात जय बाबाजी परिवार आहे. 

जय बाबाजी भक्त परिवाराची २००९ साली शांतीगिरी महाराजांना    १ लाख ४८ हजार २६ मते मिळाली होती. ही मते निर्णायक ठरली होती. १० वर्षांनंतर शांतीगिरी महाराज मैदानात येण्याच्या तयारीला लागले असून  १० वर्षांपूर्वी १४ लाख ८ हजार ७९८ मतदार होते. यावेळी मतदार संघात १८ लाख ५९ हजार मतदार आहेत. साडेचार लाखांनी मतदार वाढले आहेत. 

वर्षभरापासून मठात नेत्यांची हजेरी मागील वर्षभरात महाराजांच्या मठात भाजप, काँग्रेस नेत्यांनी हजेरी लावून स्रेहभोजनही घेतले. महाराजांना भाजपकडून उमेदवारी मिळण्याची अपेक्षा होती. नाशिक, जळगाव, औरंगाबादपैकी कुठेही त्यांना विचार झाला नाही. त्यामुळे अपक्ष उमेदवारी भरण्याचा त्यांनी विचार केला आहे. त्यांची उमेदवारी शिवसेना, काँग्रेस उमेदवारांच्या व्होटबँकेला मोठा हादरा देऊ शकते. गेल्या आठवड्यात भक्तांची मते जाणून घेतल्यानंतरच त्यांनी उमेदवारी अर्ज घेतले आहेत. त्यांची उमेदवारी राजकीय गुंता वाढवील.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९aurangabad-pcऔरंगाबादPoliticsराजकारण