शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : ज्याची खावी पोळी; त्याची वाजवावी टाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 19:13 IST

खैरेंसोबतच्या बैठकीनंतर शांतीगिरी महाराजांनी घेतली माघार 

औरंगाबाद : वेरूळच्या जनार्दन स्वामी मठाचे मठाधिपती महामंडलेश्वर शांतीगिरी मौनगिरी महाराज यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार खा. चंद्रकांत खैरे यांच्यासोबत बुधवारी सकाळी झालेल्या बैठकीनंतर महाराजांनी सायंकाळी ४ वा. पत्रकार परिषदेत ‘ज्याची खावी पोळी; त्याची वाजवावी टाळी’ असे सांगून भक्त परिवाराने नि:स्वार्थी, कर्तृत्ववान उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले. मी स्वत: व जय बाबाजी परिवाराचा कुणालाही पाठिंबा नाही, निवडणुकीत २ लाखांच्या आसपास मतदान मिळाले असते, त्यामुळे निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी नमूद केले. 

नि:स्वार्थी उमेदवार कोण आहे, या व इतर अनेक प्रश्नांचा भडिमार पत्रकारांनी शांतीगिरी यांच्यावर केला. अर्ज मागे घेण्याच्या अंतिम तारखेनंतर योग्य व कर्तृत्ववान उमेदवाराची निवड करून भूमिका जाहीर केली जाईल. ‘लढा राष्ट्रहिताचा व संकल्प शुद्ध राजकारणाचा’ हे ब्रीद घेऊन औरंगाबाद, जालना, शिर्डी-अहमदनगर, नाशिक, दिंडोरी, जळगाव, धुळे या ७ लोकसभा मतदारसंघांत बाबाजी सांगतील तेच धोरण असेल, असे शांतीगिरी म्हणाले. मतदारांनी नि:स्वार्थी उमेदवाराला  मतदान करावे, प्रलोभनाला मतदारांनी बळी पडू नये.  

समीकरणाच्या चर्चेला पूर्णविराम शांतीगिरी महाराजांनी गेल्या आठवड्यात उमेदवारी अर्ज घेतल्यामुळे राजकीय समीकरणांचा गुंता वाढण्याची चर्चा होती; परंतु त्यांनी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे. २००९ साली शांतीगिरी महाराजांनी १ लाख ४८ हजार २६ मते घेत काँग्रेसला पराभवाकडे नेले, तर शिवसेनेचे मताधिक्य कमी केले. शांतीगिरी महाराजांनी निवडणूक मैदानातून माघार घेतल्यामुळे भक्त परिवार स्वेच्छेने मतदान करण्यास मोकळा झाला आहे. कन्नड, गंगापूर आणि वैजापूर या तीन विधानसभा मतदारसंघांत मोठ्या प्रमाणात जय बाबाजी परिवार असून, ती मते निर्णायक आहेत. मागील वर्षभरात महाराजांच्या मठात भाजप, काँग्रेस नेत्यांनी हजेरी लावून स्नेहभोजनासह राजकीय चर्चा केल्या होत्या. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019aurangabad-pcऔरंगाबाद