शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : आमदार जलील आणि सत्तार यांची मालमत्ता कोटींच्या घरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 19:22 IST

शेती, घर, वाहनांसह सोन्या-चांदीची संपत्ती

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीच्या मैदानात एमआयएमकडून उतरलेले आ.इम्तियाज जलील आणि काँग्रेसचे बंडखोर सिल्लोडचे आमदार तथा अपक्ष उमेदवार अब्दुल सत्तार यांची मालमत्ता कोट्यवधींच्या घरात असल्याचे त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना सादर केलेल्या शपथपत्रातून दिसते आहे. सत्तार यांच्या तुलनेने जलील यांची मालमत्ता कमी आहे. तर सत्तार यांची मालमत्ता काही कोटींच्या घरात आहे. या दोन्ही आमदारांनी स्थावर आणि जंगम मालमत्तेचे कुटुंबियांचे विवरण उमेदवारी अर्जसोबत सादर केले. 

आ.जलील यांच्याकडील मालमत्ता आ.जलील यांची जंगम संपत्ती ५१ लाख ३४ हजार ७६८ एवढी आहे. तर स्थावर संपत्ती १ कोटी ८० लाख आहे. त्यांच्यावर ६८ लाख रुपयांचे कर्ज असून, त्यांच्याकडे डस्टर, टाटा सफारी या चारचाकी तर बुलेट, सुझुकी अ‍ॅक्सेस या दुचाकी आहेत. त्यांच्याकडे सोने नाही. मात्र पत्नी रुमी फातेमा यांच्याकडे २ लाख ७० हजार रुपये कि मतीचे ८० ग्राम सोने असल्याचे त्यांनी शपथपत्रात म्हटले आहे. पत्नी रुमी फातेमा यांची एकूण संपत्ती ६३ लाख ३२ हजार ७६८ रुपये दाखविण्यात आली आहे. गुंतवणुकीत बंधपत्रे, शेअर्स, ठेवी, एफडीचा समावेश आहे. त्यांच्या हाती ५५ हजार तर पत्नीच्या हाती २५ हजार रोख रक्कम आहे. दोन मुले आणि आईकडे एकूण १४ हजार रोख असल्याचे त्यांनी शपथपत्रात म्हटले आहे. आमदार मानधन हेच उत्पन्नाचे स्रोत असल्याचे त्यांनी नमूद केले.

आ. सत्तार यांच्याकडील मालमत्ता काँग्रेसचे बंडखोर आ.सत्तार यांच्याकडे  ३ कोटी ६९ लाख ९३ हजार ९४१ जंगम संपत्ती आहे. तर  स्थावर संपत्तीचा आकडा ८ कोटी ३९ लाख ९६ हजार ८९१ रुपयांचा आहे. सत्तार व पत्नी नफिसा बेगम यांच्यावर १ कोटी ९८ लाख ८२ हजारांचे कर्ज असल्याचे त्यांनी दाखविले आहे. फॉर्च्युनर, टाटा सफारी, ट्रॅक्टर ही वाहने त्यांच्याकडे आहेत. सोने ३५ तोळे ५ ग्रॅम, चांदी २५ तोळे कुटुंबियांकडे असून, त्याची किंमत १० लाख ६५ हजार ८०० रुपये असल्याचे शपथपत्रात नमूद केले आहे. पत्नी नफिसा बेगम यांची एकूण संपत्ती ६ कोटी ९९ लाख ६ हजार ५१ रुपये आहे. गुंतवणुकीत बंधपत्रे, शेअर्स, ठेवी, एफडीचा समावेश आहे. त्यांच्या हाती २३ लाख तर पत्नीच्या हाती २८ लाख रोख रक्कम आहे. आमदार मानधन, व्यवसाय, शेती, व्याज उत्पन्नाचे स्रोत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९aurangabad-pcऔरंगाबादAbdul Sattarअब्दुल सत्तारImtiaz Jalilइम्तियाज जलीलPoliticsराजकारण