शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

Lok Sabha Election 2019 : मतदार यादीत अनेकांच्या नावावर ‘डिलीट’चा शिक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 12:36 IST

सहा बुथवर ५ हजार ९२२ मतदानापैकी ४०० मतदारांच्या नावावर डिलीटचा शिक्का

औरंगाबाद/पिंप्रीराजा : औरंगाबाद शहरासह तालुक्यातील पिंप्रीराजा आणि इतर काही गावांमध्ये मतदारांची नावे ‘डिलीट’ केल्याचे समोर आले. 

पिंप्रीराजा येथील एकूण  सहा बुथवर ५ हजार ९२२ मतदानापैकी ४०० मतदारांच्या नावावर डिलीटचा शिक्का आढळून आला. त्यामुळे अनेक मतदार मतदानापासून वंचित राहिले. या यादीत काही नावे मृत व्यक्तींची होती; पण यात अनेक जिवंत मतदारांच्या नावांचाही समावेश असल्याचे उघडकीस आले. त्यामुळे काही मतदारांनी निवडणूक अधिकाऱ्यांना विनंती केली; पण तुमचा फोटो मतदार यादीत नसल्यामुळे तुम्हाला मतदान करता येणार नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे मतदार मतदान न करताच परतले. 

यासंदर्भात बीएलओ म्हणाले की, ग्रा.पं.ला सर्व याद्या दिल्या होत्या; पण मतदारांनी फोटो किंवा कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे त्यांचे नाव डिलीट झाल्याचे सांगितले. यासंदर्भात सरपंच म्हणाले की, गावातील अनेक मतदारांचे नाव डिलीट झाले आहे. ते दुरुस्त करून घ्यावे, अशी विनंती तालुका निवडणूक अधिकारी परदेशी यांना केली; पण त्यांनी प्रतिसाद दिला नसल्याचा आरोप सरपंचांनी केला.

यादीतून अनेकांची नावे गायब मतदार यादीत नाव नसल्याने तर काहींची नावे इतरत्र ठिकाणी असल्याने अनेक मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागले. तीसगाव येथील सरोजिनी बढे, अतुल बढे, संजय पाटील, वडगाव कोल्हाटी येथील आशा साळवे, सुनीता चव्हाण यांची नावे मतदार यादीतून गायब झाल्याने त्यांना मतदान करता आले नाही. अशा अनेक मतदारांना ओळखपत्र असूनही मतदान केंद्रावर आल्यावर केवळ यादीत नाव नसल्याने मतदान न करताच घरी जावे लागल्याचे चित्र वाळूज महानगर परिसरात दिसून आले. 

ईडीसी न मिळाल्यामुळे मतदानापासून वंचित इलेक्शन ड्यूटी सर्टिफिकेट  (ईडीसी) न मिळाल्यामुळे अनेक सरकारी कर्मचारी मतदानापासून वंचित राहिले. मतदारसंघ बदलल्यामुळे काही कर्मचाऱ्यांना ईडीसी मिळाले नाही. परिणामी त्यांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही. ईडीसी भरून घेतल्यानंतर १२ (ड) अर्ज मिळतो, तो अर्जही मतदारांना मिळाला नाही. याप्रकरणी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी उदय चौधरी यांनी सांगितले. शासकीय कर्मचाऱ्यांचे ईडीसी प्रशिक्षणादरम्यान भरून घेण्यात आले होते. ५५०० कर्मचाऱ्यांना ते देण्यात आले होते. शहर पोलिसांसह इतर कर्मचाऱ्यांसाठी ईडीसी दिले होते. ईडीसीआधारे कुठल्याही मतदान केंद्रांवर संबंधित मतदाराला मतदान करता येणे शक्य होते. बीएलओकडे ईडीसी जमा करून मतदानाचा हक्क बजावता येतो. काही ठिकाणी ईडीसी न मिळाल्याच्या तक्रारी होत्या, याबाबत जिल्हाधिकारी म्हणाले, ठराविक तक्रारी माझ्यापर्यंत आल्या नाहीत. 

सोशल मीडियातून गोपनीयतेचा भंगसोशल मीडियातून अनेक मतदारांनी कुणाला मतदान केले, त्याची माहिती फेसबुकवर टाकून मतदान गोपनीयतेचा भंग केला. जिल्हा व राज्य पातळीवरील समितीकडे याबाबत माहिती देण्यात आली आहे. ज्यांनी मतदान गोपनीयतेचा भंग केला, त्यांना सोशल मीडियातून ट्रेस करून त्यांच्यावर गुन्हा दाखल होईल. तत्पूर्वी, समितीमार्फत याबाबत चौकशी करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी म्हणाले. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९aurangabad-pcऔरंगाबादMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019