शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
5
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
6
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
7
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
8
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
9
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
10
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
11
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
12
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
13
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
14
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
15
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
16
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
17
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
18
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
19
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
20
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : वचन देण्यापुरताच खैरेंचा वचननामा मर्यादित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 14:40 IST

खैरे विकासाचा मुद्दा घेऊन मतदारांना सामोरे जात आहेत.

ठळक मुद्देशहर तहानेने व्याकूळ गुंठेवारीचा प्रश्न कायमनवी रेल्वे कागदावरचवचननाम्याविषयी बोंबाबोंबच

औरंगाबाद : लोकसभा मतदारसंघातून शिवसेना-भाजपा, रिपाइं (आ), रासप गटाचे उमेदवार खा. चंद्रकांत खैरे हे मैदानात आहेत. १९९९ पासून ते मतदारसंघातून संसदेत जात असून, जिल्ह्यातील प्रत्येक ठिकाणी प्रचारात सेवा, सुरक्षा, विकासाचा मुद्दा घेऊन ते मतदारांना सामोरे जात आहेत. समाजसेवा हेच ध्येच असल्याचे ते सांगतात. आजवर शहरातील बहुतांश विकासकामांचा दाखला देऊन आगामी काळात संधी मिळाल्यास शहरात विकासकामे करणार असल्याचे सध्या सांगत असले तरी मागील निवडणुकीत त्यांनी जो जाहीरनामा सादर केला होता, त्यातील किती कामे पूर्ण झाली, याचा लेखाजोखा. 

समांतर जलवाहिनी, भूमिगत गटार योजना आणि सिमेंट रस्ते करणार असल्याचे त्यांनी मागच्या निवडणुकीत जाहीर केले होते. समांतर जलवाहिनी काही पूर्ण झाली नाही. भूमिगत गटार योजना गटांगळ्या खात आहे, तर शहरातील सिमेंट रस्त्यांवरून अजूनही ओरड सुरू आहे. शहरात पाणीपुरवठाही तीन दिवसाआड होतो आहे, पर्यटननगरी खड्ड्यांत गेली आहे. औरंगाबाद जरी ऐतिहासिक व पर्यटनाचे शहर असले तरी त्याचे मार्केटिंग चांगले झालेले नाही. रस्ते पाहिल्यावर पर्यटक एकदा आले, तर नंतर पुन्हा येणार नाहीत, अशी अवस्था आहे. पुरातत्व विभागाची बांधकाम स्थगिती उठविणे, समांतरसाठी केंद्राचा निधी मिळविणे, भूमिगत गटार योजनेसाठी केंद्राचा निधी मिळविण्यासारखी कामे खा. खैरे यांना आघाडी सरकारच्या काळात करता आली.

२०१४ पासून आजपर्यंत केंद्र शासनाकडून खासदार म्हणून त्यांना उल्लेखनीय असे कोणतेही काम करता आलेले नाही. विमानसेवा, रेल्वेवाहतूक, औरंगाबद रिंगरोड, बीड बायपास, जालना रोडसाठी केंद्र शासनाकडून निधी आणण्याबाबत त्यांना काहीही करता आलेले नाही. संसदेतील अधिवेशनात हजेरी लावणे आणि प्रश्न उपस्थित करण्यापलीकडे शहर व जिल्हा म्हणून केंद्र शासनाकडून विशेष असे योगदान मागील पाच वर्षांत मिळविता आले नाही.

असा होता वचननामा                                                                                     सद्य:स्थितीत काय आहे१. समांतर जलवाहिनी योजनेतून २४ तास पाणी देणार                                  योजना सुरूच झाली नाही२. टुरिझम हब म्हणून सर्वांगीण विकास करणार                                            आश्वासन कागदावरच राहिले३. खाम नदी व नहर-ए-अंबरीचे पुनरुज्जीवन करणार                                    काहीही केले नाही४. हिमायतबागेचा कृषी उद्यान विकास करणार                                            काहीही केले नाही५. औद्योगिक वसाहतीत एकात्मिक वाहतूक प्रणाली आणणार                                                                                                                                                                                                       घोषणेपुरते राहिला मुद्दा६. ग्रामीण भागातील पाण्याचा प्रश्न सोडविणार                                             प्रश्न सुटलेला नाही७. दुष्काळग्रस्तांना भरीव मदतीचे आश्वासन                                                 यावर फक्त आंदोलने केली८. औद्योगिक वसाहतींसाठी विशेष योजना राबविणार                                  कुठलीही योजना राबविली नाही९. शहरातील गुंठेवारीची समस्या सोडविणार                                                 गुंठेवारीतील प्रश्न जैसे थे१०. नवीन रेल्वे सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार                                          फारसे प्रयत्न केले नाहीत११. शहराबाहेर हायवे चौपदरी करण्याचे आश्वासन                                       कुठलेही प्रयत्न झाले नाहीत१२. जिल्ह्यात वारकरी भवन उभारणार                                                        मुद्दा कागदावरच राहिला

जिल्ह्यात विकासकामे केलीखा. चंद्रकांत खैरे यांनी जिल्ह्यात अनेक विकासकामे केली आहेत. दुष्काळामुळे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना मदत तर केलीच. शिवाय सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला. शहरातील रस्ते विकासासाठी राज्य आणि केंद्र शासनाकडे पाठपुरावा केल्यामुळेच निधी मिळाला.     -प्रशांत डिघुळे 

दलित वस्तीत एकही काम नाहीशहर व जिल्हा भरात दलित वस्तीत कोणतेही विकासकाम करण्यात आलेले नाही. त्यामुळे जिल्ह्याला खासदाराचे काम काय असते, याविषयी कोणतेही आश्वासन फक्त निवडणुकीपुरतेच मर्यादित असते. जनतेच्या प्रश्नाकडे सतत दुर्लक्ष झाले आहे. -सुनील घाटे

ऐतिहासिक शहराचा कचरा केलाऐतिहासिक तसेच औद्योगिक क्षेत्रासह शहराच्या पर्यटनाचा खा. चंद्रकांत खैरे यांनी कचराच केला असून, कामगार बेरोजगार झाले तरीदेखील केंद्रात एकदाही कामगार कायद्यावर ठराव मांडला नाही. २० वर्षांत नेत्रदिपक कामगिरीची कोणताही इतिहास सांगणे शक्य नाही. - अ‍ॅड. उद्धव भवलकर

वाड्या, तांड्यांवर कामे झालीनिवडणूक जाहीरनाम्यात कार्यकर्त्यांना व स्थानिक नागरिकांना दिलेल्या आश्वासनात रस्ते, तसेच सामाजिक सभागृहाचे काम खा. चंद्रकांत खैरे यांच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे. वस्ती, वाड्या, तांड्यांवर ते सतत धावून येतात. - राजेंद्र राठोड  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९aurangabad-pcऔरंगाबादPoliticsराजकारण