शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : खैरेंच्या भेटीनंतर शांतिगिरी महाराजांचा निर्णय बदलला; निवडणूक न लढता करणार मतदार जागृती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 18:18 IST

हिंदू मतांचे विभाजन टाळण्यासाठी घेतला निर्णय

औरंगाबाद : खैरेंच्या भेटीनंतर वेरूळच्या जनार्दन स्वामी मठाचे मठाधिपती महामंडलेश्वर शांतीगिरी मौनगिरी महाराज यांनी लोकसभा निवडणुक न लढण्याची भूमिका आज पत्रकार परिषदेत जाहीर केली. हिंदू मतांचे विभाजन टाळण्यासाठी आपण निवडणूक लढणार नसल्याचे त्यांनी जाहीर करत आपण मतदार जनजागृती करणार आल्याची माहिती दिली. 

शुक्रवारी निवडणुकीच्या अनुषंगाने  शांतीगिरी महाराजांनी दोन उमेदवारी अर्ज घेऊन औरंगाबाद लोकसभा निवडणूक लढण्यासाठी संकेत दिले होते. शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार खा. चंद्रकांत खैरे, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार आ. सुभाष झांबड, अपक्ष उमेदवार आ. हर्षवर्धन जाधव, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आ. इम्तियाज जलील यांनी आजवर उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. या पार्श्वभूमीवर महाराजांनी  आज पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, हिंदू मतांचे विभाजन टाळण्यासाठी आपण निवडणूक लढणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मतदानाचा टक्का वाढण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करणार आहोत. 

खैरेंच्या भेटीनंतर झाला निर्णय शांतिगिरी महाराज यांनी युतीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांची आज सकाळी भेट झाली. यानंतर हिंदू मतदानाचे विभाजन होऊ नये यामुळे आपण निवडणुकीतून माघार घेतल्याचे स्पष्ट केले. 

२००९ ला लढवली होती निवडणूक शांतीगिरी महाराज यांनी २००९ ला औरंगाबाद लोकसभा मतदार संघातून  निवडणूक लढवली होती. यात १ लाख ४८ हजार २६ मते घेत त्यांनी काँग्रेसला पराभवाकडे नेले तर शिवसेनेचे मताधिक्य कमी केले होते. ही मते निर्णायक ठरली होती. कन्नड, गंगापूर आणि वैजापूर या तीन विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात जय बाबाजी परिवार आहे. 

वर्षभरापासून मठात नेत्यांची हजेरी मागील वर्षभरात महाराजांच्या मठात भाजप, काँग्रेस नेत्यांनी हजेरी लावून स्रेहभोजनही घेतले. महाराजांना भाजपकडून उमेदवारी मिळण्याची अपेक्षा होती. नाशिक, जळगाव, औरंगाबादपैकी कुठेही त्यांना विचार झाला नाही.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९aurangabad-pcऔरंगाबादPoliticsराजकारण