शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ५ हजार अंगणवाड्यांना कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 00:35 IST

अंगणवाडीसेविकांना शासकीय कर्मचाºयांचा दर्जा द्यावा, मानधनाऐवजी वेतन द्यावे या प्रमुख मागण्यांसाठी मंगळवारी जिल्हा परिषदेवर राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने मोर्चा काढून थाळीनाद आंदोलन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: अंगणवाडीसेविकांना शासकीय कर्मचाºयांचा दर्जा द्यावा, मानधनाऐवजी वेतन द्यावे या प्रमुख मागण्यांसाठी मंगळवारी जिल्हा परिषदेवर राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने मोर्चा काढून थाळीनाद आंदोलन करण्यात आले.राज्यात अंगणवाडीसेविकांना ५ हजार रुपये व मदतनिसांना केवळ अडीच हजार रुपये मानधन मिळते. त्याच तुलनेत देशातील केरळ, तेलंगणा, दिल्ली व अन्य छोट्या राज्यांतील अंगणवाडीसेविकांना दुप्पट मानधन मिळते. शासनाने या बाबीचा विचार करत २०१६ रोजी मानधनवाढ समिती गठीत केली होती. त्या समितीने ९ मार्च २०१७ रोजी अहवालही सादर केला आहे. या अहवालावर महिला व बालविकास मंत्री, वित्तमंत्री यांच्याशी चर्चा करुन मानधनवाढीचे आश्वासनही दिले होते. मात्र प्रत्यक्षात मानधनवाढ झाली नाही. त्यामुळे राज्यातील अंगणवाडी कर्मचारी ११ सप्टेंबरपासून संपावर गेले आहेत. जिल्ह्यातीलही अंगणवाडी कर्मचाºयांनी या संपात सहभाग नोंदविला आहे. जिल्ह्यातील ५ हजार अंगणवाड्या आजघडीला बंद आहेत. तसेच पाच हजारांहून अधिक अंगणवाडी कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत. मोर्चाचे नेतृत्व अंगणवाडी कर्मचारी संघाच्या मंगला सराफ, राजू लोखंडे, जिल्हाध्यक्षा शततारका काटकाडे, अश्विनी महल्ले, वंदना पवार, सत्वशिला पंडित, महानंदा पांचाळ आदींनी केले़