शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

स्थानिक प्रश्नांना हुलकावणी !

By admin | Updated: October 5, 2014 00:49 IST

संजय तिपाले , बीड पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी जिल्हा दौऱ्यावर होते़ ते काय बोलणार? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे कान टवकारले होते़ ऊसतोड मजूर, रेल्वे या जिल्ह्याच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर ते ठोस

संजय तिपाले , बीडपंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी जिल्हा दौऱ्यावर होते़ ते काय बोलणार? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे कान टवकारले होते़ ऊसतोड मजूर, रेल्वे या जिल्ह्याच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर ते ठोस आश्वासन देतील, अशी अपेक्षा होती़ अर्ध्या तासाच्या भाषणात मोदी यांनी राज्य ते जागतिक स्तरावरील प्रश्नांचा उहापोह केला;परंतु स्थानिक प्रश्नांना बगलच दिली़ त्यामुळे ‘अच्छे दिन आनेवाले हैं’ ही अपेक्षा बाळगणाऱ्या बीडकरांचा अपेक्षाभंग झाला़लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणुकीतील भाजप उमेदवारांच्या प्रचारानिमित्ताने पंतप्रधान झाल्यानंतर मोदी पहिल्यांदाच बीडला आले होते़ ‘अच्छे दिन आने वाले हैं’ चा नारा देत ज्या मोदींनी लोकसभा निवडणुकीत संपूर्ण देश ढवळून काढला ते मोदी बीडच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी काय बोलतात? याची सर्वांनाच उत्सुकता होती़‘भाईयों और बहनों़़़’ अशी साद घालत मोदी यांनी भाषणाला सुरुवात केली़ ‘गोपीनाथ मुंडेसे मेरा ३० सालसे गहेरा संबंध था़़़ लोगोंका कल्याण करनेवाला गोपीनाथ मेरा छोटा भाई था़़’ अशी कृतज्ञ भावनाही त्यांनी व्यक्त केली़ त्यानंतर त्यांनी राज्यातील आघाडी सरकारवर सडकून टीका केली़ आघाडी सरकारने तुम्हाला १५ वर्षांत काय दिले? असा सवाल उपस्थित करुन त्यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीवर शरसंधान साधले अन् नेहमीच्याच ‘स्टाईल’ मध्ये सभेवर छाप सोडली़ पुढे महाराष्ट्र व गुजरातच्या विकासाची तुलना केली़ विकासात महाराष्ट्राला गुजरातच्याही पुढे नेऊन ठेवणार अशी ग्वाही त्यांनी दिली खरी;परंतु सर्वाधिक ऊसतोड मजुर व कापूस उत्पादनात अग्रेसर असलेल्या बीड जिल्ह्याला त्यांनी कुठलेच ठोस आश्वासन दिले नाही़ दरम्यान, मोदी यांनी भाषणाच्या उत्तरार्धात महाराष्ट्राला काय दिले? याचा लेखाजोखा मांडला़ औरंगाबादला जपानच्या मदतीने उद्योग, चीनच्या सहाय्याने औद्योगिक पार्क, मुंबई ते अहमदबाद जलदगती रेल्वे, मुंबई व शांघायमध्ये विकासासाठी करार, ५०० शहरांमध्ये पाण्याची योजना या बाबींचा उल्लेख केला; परंतु स्थानिक प्रश्नाला थेट हात घालण्याचे त्यांनी टाळले़जानकरांच्या चिठ्ठीनंतर मोदींचा रेल्वेप्रश्नाला ‘दे धक्का’४उसतोड मजुरांचे स्थलांतर, विमा, रोजगार या प्रश्नावर पंतप्रधान मोदी यांनी चकार शब्दही काढला नाही़ शिवाय दुष्काळ, सिंचन, कापूस प्रक्रिया उद्योगाचा अभाव यावरही ते बोलले नाहीत़ ४मोदी भाषण उरकरण्याच्या तयारीत असतानाच रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी त्यांच्याकडे चिठ्ठी सरकवली़ त्यानंतर मोदी यांनी ‘...और रेल्वे का सपना भी तो पुरा करना है’ अशा एका वाक्यात रेल्वेचा विषय गुंडाळला आणि ‘दे धक्का’ देत बीडकरांचा निरोप घेतला़ ४बीडकरांनी वर्षानुवर्षे पाहिलेल्या रेल्वेच्या स्वप्नाला मोदींनी केवळ एका वाक्यात उरकल्याने हिरमोड झाला़४विशेष म्हणजे पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणात ‘यहाँ के लोग गन्ना काटते है़ मैने पिता और यहाँ की जनता ने नेता खो दिया है़ ये जनता अब आपके हवाले है़’ असे सांगून मोदींचे उसतोड मजूरांकडे लक्ष वेधले होते़४या उपरही पंतप्रधान मोदी यांनी हा विषय भाषणात घेण्याचे टाळले़जिल्ह्यातील समस्या व इथल्या प्रश्नांची गोपीनाथराव मुंडे यांना खडान्खडा माहिती होती़ हे प्रश्न श्रेष्ठींकडे मांडून ते सोडविण्याची त्यांची हातोटी होती़४देशाचे पंतप्रधान बीड जिल्ह्यात आले असताना त्यांच्या समोर जिल्ह्यातील रेल्वे, उसतोड मजूर, सिंचन, औद्योगिक विकास, बेरोजगारी या प्रश्नांचा डांगोरा अत्यंत खुबीने स्व़ मुंडे यांनी पिटला असता आणि बहुतांश प्रश्नांवर न्यायही मिळवला असता़४मोदींना भाषणाच्या शेवटी रेल्वेवर बोला या संदर्भात चिठ्ठी देण्याची वेळ आल्याने त्यांना या विषयावर बोलायचे होते की नाही असाही प्रश्न निर्माण झाला़