शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

ग्लोबल द्राक्ष अवकाळीमुळे ‘लोकल’

By admin | Updated: March 18, 2017 23:22 IST

किल्लारी दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे रबी बरोबरच द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

सूर्यकांत बाळापुरे किल्लारीदोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे रबी बरोबरच द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. औसा तालुक्यातील जवळपास ५० एकरवरील विदेशात निर्यात होणारी द्राक्ष आता लोकलच्या बाजारात विक्री करावी लागणार आहे. त्यामुळे द्राक्ष बागायतदारांना सर्वात मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यातील औसा तालुक्यातून द्राक्षांची सर्वाधिक दरवर्षी निर्यात होते. गेल्या तीन वर्षांत दुष्काळामुळे तालुक्यातील द्राक्षबागा उद्ध्वस्त झाल्या. या संकटातून काही शेतकऱ्यांनी टँकरद्वारे पाणी देऊन मार्ग काढीत द्राक्ष बागा जगविल्या. सध्या द्राक्षांची काढणी सुरू असून, निर्यातही सुरू आहे. दरम्यान, बुधवारी आणि गुरुवारी औसा तालुक्यात गारांचा पाऊस झाला. यामुळे तालुक्यातील किल्लारीसह मंगरुळ, नांदुर्गा, येल्लोरी परिसरातील द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गारांमुळे द्राक्षांच्या घडांचे मणी नरम पडून गळाले आहेत. त्याचबरोबर द्राक्षांच्या मण्यांवरील शायनिंगही उडाली आहे. काही बागांमध्ये मण्यांवर रेषा पडून डाग पडले आहेत. त्यामुळे ही द्राक्षे आता बागायतदारांना स्थानिक पातळीवरील बाजारातच विक्री करावी लागणार आहे.गारांमुळे किल्लारी परिसरातील विनोद बाभळसुरे, विश्वजित पाटील यांच्या प्रत्येकी दोन एकर, बस्वराज बिराजदार, बाबुराव वाडीकर यांच्या प्रत्येकी अडीच एकर तर पांडुरंग चेळकर यांच्या तीन एकर बागेचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर परिसरातील मंगरुळ, नांदुर्गा, येल्लोरी येथील द्राक्ष बागायतदारांचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे हे बागायतदार आता चिंताग्रस्त झाले आहेत. शासनाने पंचनामे करून योग्य भरपाई द्यावी, अशी मागणी द्राक्ष बागायतदारांकडून केली जात आहे. गेल्या तीन वर्षांत पाण्याअभावी तर यंदा गारपिटीमुळे द्राक्षांचे नुकसान झाले आहे. नैसर्गिक संकटामुळे शेतकरी हतबल झाले आहेत.