शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

सभापतीपदासाठी ‘लॉबिंग’

By admin | Updated: March 24, 2017 00:06 IST

बीड : जिल्हा परिषदेच्या सत्तास्थानी पोहोचलेल्या युतीमध्ये अध्यक्ष- उपाध्यक्ष निवडीनंतर आता सभापतीपदांसाठी जोरदार ‘लॉबिंग’ सुरु झाले आहे.

बीड : अगदी शेवटच्या क्षणी मतांचा आकडा जुळवत जिल्हा परिषदेच्या सत्तास्थानी पोहोचलेल्या युतीमध्ये अध्यक्ष- उपाध्यक्ष निवडीनंतर आता सभापतीपदांसाठी जोरदार ‘लॉबिंग’ सुरु झाले आहे. युतीच्या सत्तेला ‘हात’भार लावणाऱ्या काँग्रेसच्या एकमेव सदस्यासह शिवसेनेचे युद्धजित पंडित, भाजपचे संतोष हंगे, डॉ. योगिनी थोरात, माजी मंत्री सुरेश धस गटाकडून अ‍ॅड. प्रकाश कवठेकर, अश्विनी जरांगे सभापतीपदाच्या स्पर्धेत आहेत. पालकमंत्री पंकजा मुंडे कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करतात? याकडे सर्वांचे लक्ष आहे.माजी मंत्री सुरेश धस गटाच्या पाच सदस्यांना ऐनवेळी आपल्या तंबूत खेचून पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीची सत्तास्वप्ने उधळून लावली. अध्यक्षपदी भाजपच्या सविता गोल्हार तर उपाध्यक्षपदी शिवसंग्रामच्या जयश्री मस्के यांची निवड करण्यात आली आहे. पशुसंवर्धन व कृषी विभाग उपाध्यक्षांकडे राहील. समाजकल्याण, शिक्षण व आरोग्य, महिला व बालकल्याण, अर्थ व बांधकाम या चार समित्यांसाठी सभापतींची निवड होणार आहे.अध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेल्या भाजपच्या डॉ. योगिनी थोरात यांचे नाव ऐनवेळी मागे पडले. त्यामुळे त्यांना महिला व बालकल्याण समिती सभापतीपदासाठी संधी दिली जाऊ शकते. माजी मंत्री सुरेश धस यांचा टेकू मिळाल्यानेच भाजपच्या हाती सत्तेच्या चाव्या आल्या. त्यामुळे त्यांच्या गटाला एक समिती दिली जाईल. धस समर्थक अश्विनी जरांगे व अ‍ॅड. प्रकाश कवठेकर यांची नावे आघाडीवर आहेत. महिला व बालकल्याण किंवा शिक्षण व आरोग्य यापैकी एक खाते धस गटाला दिले जाण्याची शक्यता आहे. भाजप युवा मोर्चाचे जिल्हाप्रमुख संतोष हंगे यांनाही निष्ठेचे फळ मिळेल, असे सांगितले जाते. त्यांना समाजकल्याण समितीच्या सभापतीपदी संधी देण्याचे ठरले असल्याचे सूत्रांनी सांगितले. उपाध्यक्षपदाचे दावेदार सेनेचे युद्धजित पंडित यांना आ. लक्ष्मण पवार यांनी विरोध केला. त्यामुळे त्यांच्या जागी शिवसंग्रामच्या जयश्री मस्के यांना ‘लॉटरी’ लागली. त्याचवेळी युद्धजित यांना अर्थ व बांधकाम समिती देण्याचा शब्द पालकमंत्री पंकजा यांनी दिलेला आहे. यापूर्वी उपाध्यक्षांकडे अर्थ व बांधकाम खाते असायचे; पण अडीच वर्षांपूर्वी ही प्रथा बंद पडली. काँग्रेसच्या आशा दौंड यांना उपाध्यक्षपद मिळाले; पण त्यांच्याकडील अर्थ व बांधकाम खाते काढून त्यांना पशुसंवर्धन व कृषी खाते दिले होते. यावेळीही उपाध्यक्षांकडे ही दोन खाती कायम राहतील.तथापि, काँग्रेसचे राजेसाहेब देशमुख यांनी अध्यक्ष- उपाध्यक्ष निवडीत भाजपला साथ दिली. त्याची बक्षिसी म्हणून त्यांनाही सभापतीपदाची ‘लॉटरी’ लागू शकते. शिक्षण व आरोग्य खात्याच्या सभापतीपदाकडे ‘क्रिमपोस्ट’ म्हणून पाहिले जाते. हे खाते पदरात पाडून घेण्यासाठी इच्छुकांनी हायकमांडकडे ‘लॉबिंग’ सुरु केले आहे. पक्ष कोणाला संधी देतो ? याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. (प्रतिनिधी)