प्रजासत्ताकदिनी म्हणजेच दि. २६ जानेवारी रोजी सारा परिवर्तन हर्सूल सावंगी, नायगाव रोड, मिनी स्मार्ट सिटीमधील सेक्टर फेज-बी आवारात हा लकी ड्रॉचा कार्यक्रम घेण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक के. मुदिराज व सारा ग्रुपचे चेअरमन सीताराम अग्रवाल यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. हा केवळ कार्यक्रम नव्हताच तर सामान्य माणसांची स्वप्नपूर्ती करणारा तो एक सोहळा होता.
कारण लकी ड्रॉ आणि त्यातून मिळणारी बक्षिसे यांची सुखस्वप्ने सर्वांनाच दाखविली जातात. पण वास्तवात मात्र लकी ड्रॉचे बक्षीस मिळणे हे शेवटी स्वप्नच राहून जाते. पण विश्वासार्हता आणि प्रामाणिकपणा ही तत्त्वे कसाेशीने पाळून मागील अनेक वर्षांपासून व्यवसाय करणाऱ्या सारा ग्रुपने मात्र आपले वचन तंतोतंत पाळले आणि सामान्यांची सुखस्वप्ने पूर्ण केली.
सारा परिवर्तनच्या वतीने हर्सूल सावंगी, नायगाव रोड येथे मिनी स्मार्ट सिटीचा भव्य प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या एकूण १३७५ घरांमधील शेवटच्या १६१ घरांपैकी पहिल्या ५० घरांसाठी भव्य लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले होते. सारा परिवर्तन मिनी स्मार्ट सिटीमध्ये दिवाळी व नववर्षानिमित्त घर खरेदीवर लकी ड्रॉची योजना राबविण्यात आली होती. यामध्ये पंढरीनाथ धोत्रे व हिरा धोत्रे या पहिल्या भाग्यवंत ग्राहकाने आल्टो कार जिंकली. आजवर सायकलवर फिरणाऱ्या या भाग्यवान विजेत्याकडे जेव्हा चारचाकी आली तेव्हा तर आपण स्वप्न पाहत आहोत की आपले स्वप्न पूर्ण झाले आहे, यातला फरकच या विजेत्यांना कळत नव्हता. आनंदाश्रूंनी भरलेले डोळे आणि चेहऱ्यावरचा विलक्षण आनंद उपस्थितानाही गहिवरून टाकणारा होता.
यासोबतच दोन ग्राहकांना सुझुकी स्पोर्ट मोपेड हे द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले. दोन ग्राहकांना हिरो पॅशन प्रो हे तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. यानंतर इ- बाइक, पाच ग्राहकांना एसी, १० ग्राहकांना फ्रीज, चार ग्राहकांना स्पोर्ट सायकल व २५ ग्राहकांना स्मार्ट मोबाइल फोन, अशा एकूण ५० ग्राहकांना या लकी ड्रॉमध्ये आकर्षक बक्षिसे मिळाली.
अतिशय दर्जेदार झालेल्या या कार्यक्रमाचे संचालन प्रसिद्ध अभिनेते प्रसाद कुलकर्णी यांनी केले. तसेच प्रजासत्ताक दिनानिमित्त प्यारेलाल मोरे यांच्या श्रवणीय गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजनही सारा परिवर्तन येथे राहणाऱ्या रहिवाशांसाठी आणि सर्वच उपस्थितांसाठी करण्यात आला होता. सारा ग्रुपचे जनरल मॅनेजर (टेक्निकल) अमोल क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनानुसार सर्व कार्यक्रम राबविण्यात आला.