शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठ्यांची ‘सरसकट ओबीसीची मागणी स्वीकारलेली नाही’; CM देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
2
आजचे राशीभविष्य, ५ सप्टेंबर २०२५: प्रवासाचे बेत, प्रियव्यक्तीचा सहवास पण वाणीवर संयम ठेवा !
3
जीएसटीतील बदलामुळे सामान्यांचा मोठा फायदा; अर्थव्यवस्थेलाही मिळेल बूस्टर, PM मोदींना विश्वास
4
शिक्षणाच्या दर्जात आयआयटी मद्रास अव्वलच...; क्रमवारीत आयआयटी बॉम्बे तिसऱ्या स्थानावर
5
यू टर्न की मास्टरस्ट्रोक? जनतेच्या खिशातून अधिकचेच पैसे काढले; ८ वर्षांनी सरकारच्या लक्षात आले
6
मराठा, ओबीसी आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमित्यांचे कार्य समांतर - चंद्रशेखर बावनकुळे
7
कुजबुज! राज ठाकरेंचं एवढेच वाक्य वादळ ठरले; शिंदेसेनेच्या आमदाराने लगावला टोला, "आधी लोकांमधून.."
8
प्रवाशांनी लावला रेल्वेला चुना, त्यामुळे आता स्थानकात क्यूआर तिकीट बंद; प्रशासनाचा निर्णय
9
"मराठी माणूस एकटवला, म्हणून..."; निदर्शनांवर निर्बंधांच्या मागणीवरून मिलिंद देवरांवर टीकेची झोड 
10
जीआरवर उगाच संभ्रम निर्माण केला जातोय; दगाफटका केला तर सुपडा साफ होईल, मनोज जरांगेंचा इशारा
11
ओ देवाभाऊ, तुही जात कंची? फडणवीसांवर विषारी टीका करणाऱ्यांपेक्षा त्यांच्या नेतृत्वावर...
12
घटनात्मक गुंतागुंत! एखाद्या विधिमंडळ सदस्याने चुकीचे वर्तन केले तर त्याला शिक्षा कोण देणार?
13
२३ वर्षीय प्रियकर, ८३ वर्षीय प्रेयसी! अनोखी प्रेमकहाणी आली चर्चेत; मैत्रिणीच्या घरी गेला अन्...
14
पक्ष्यांसह विमानांच्या सुरक्षेवर आता ‘बर्डगार्ड’ ठेवणार वॉच; नवी मुंबई विमानतळ कंपनीची माहिती
15
३ वेळा १० थर, तरी विश्वविक्रम नाही; कुठेतरी पाणी मुरतंय, जय जवान गोविंदा पथकाचा आरोप
16
पत्नीने प्रेयसीसोबत लॉजवर पकडलं; घाबरलेल्या पतीने खाडीत मारली उडी, त्यानंतर 'असं' काही घडलं...
17
जगभ्रमंतीसाठी निघालेल्या नवी मुंबईच्या ट्रॅव्हल ब्लॉगरची दुचाकी इंग्लंडमध्ये चोरीला
18
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
19
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
20
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?

खुलताबादेत जय्यत तयारी

By admin | Updated: July 26, 2014 01:11 IST

खुलताबाद : येथील भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी श्रावण महिन्यातील शनिवारी लाखो भाविकांची गर्दी होत असते.

खुलताबाद : येथील भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी श्रावण महिन्यातील शनिवारी लाखो भाविकांची गर्दी होत असते. त्याचबरोबर उद्या शनी अमावास्येला दर्शनाचे मोठे महत्त्व असल्याने मोठी गर्दी होणार असल्याने भद्रा मारुती संस्थानने जय्यत तयारी केली आहे. वाढती गर्दी लक्षात घेता पोलीस प्रशासनाने अधिकारी, कर्मचारी असा २०० पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला आहे.भद्रा मारुतीच्या दर्शनाला नगर, नाशिक, जळगाव, जालना, धुळे, औरंगाबाद शहर व जिल्ह्यातून मोठ्या संख्येने भाविक दर्शनाला येत असतात. त्याचप्रमाणे औरंगाबाद शहर व परिसरातून रात्री पायी येणाऱ्या भाविकांची संख्या जास्त असल्याने रात्रीपासूनच पोलीस बंदोबस्त तैनात करावा लागतो. यंदाच्या श्रावण महिन्यासाठी व शनी अमावास्येसाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवलाल पुरभे यांनी २० अधिकारी, १५० पोलीस, ३० महिला पोलीस, एक दंगाकाबू पथक, वाहतूक शाखेचे पोलीस, गुन्हे शाखा पोलीस असा जवळपास २०० पोलिसांचा बंदोबस्त शुक्रवारी सायंकाळपासूनच तैनात केला आहे. पत्र्याचे भव्य शेडयेणाऱ्या भाविकांना पावसापासून त्रास होऊ नये म्हणून मंदिरासमोर पत्र्याचे भव्य शेड उभारण्यात येत आहे. त्याचबरोबर पाणी, दवाखाना आदींची व्यवस्था करण्यात आली आहे.सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर मंदिर परिसरात होणारी गर्दी लक्षात घेता भद्रा मारुती संस्थानच्या वतीने सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. पावसात लांबच लांब रांगा लागतात, त्यामुळे सभामंडपात झिकझॅक पद्धतीने बॅरीकेटस् लावण्यात आल्याने लांब रांगा लागणार नाही, असे सुरक्षा अधिकारी राजेंद्र जोंधळे यांनी सांगितले.स्पेशल दर्शन भाविकांची गर्दी लक्षात घेता ज्या भाविकांना झटपट दर्शन घ्यायचे आहे, अशा भाविकांसाठी स्पेशल दर्शन ५० रुपये ठेवण्यात आले आहे. (वार्ताहर)वेरूळच्या घृष्णेश्वर देवस्थानाची बैठकवेरूळ : रविवारपासून श्रावण मास सुरू होत असल्याने येथील घृष्णेश्वर देवस्थानातर्फे जय्यत तयारी करण्यात आली आहे. यासंदर्भात नियोजन करण्यासाठी शुक्रवारी संबंधित अधिकारी व देवस्थान पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी उपविभागीय अधिकारी नंदकर, उपविभागीय पोलीस अधिकारी यावलकर, तहसीलदार बालाजी शेवाळे, घृष्णेश्वर देवस्थानचे अध्यक्ष संजय वैद्य, ग्रामसेवक बी.आर. म्हस्के, महावितरणचे अभियंता, दुकानदार संघटेनेचे गणेश हजारी, मकरंद आपटे, विजय भालेराव आदी उपस्थित होते. भाविकांना सुरळीत दर्शन घेता यावे, यासाठी काही सूचना दिल्या असून त्या अनुषंगाने नियोजन करणे सुरू आहे.