शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळाच्या छायेने पशुधन बाजारात

By admin | Updated: August 13, 2014 00:59 IST

पाडळसिंगी: दररोज ढग भरभरुन येत असले तरी पाऊस पडत नसल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. अशात पशुधन जगविण्यासाठी चाराही नसल्याने व

पाडळसिंगी: दररोज ढग भरभरुन येत असले तरी पाऊस पडत नसल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. अशात पशुधन जगविण्यासाठी चाराही नसल्याने व पशुखाद्य महागल्याने जनावरे जगवावीत कशी? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे. परिणामी अनेक शेतकऱ्यांनी आपले पशुधन विक्रीसाठी हिरापूर येथील बाजारात आणल्याचे मंगळवारी दिसून आले.बीड जिल्ह्यातील हिरापूर, नेकनूर, राजेगाव हे जनावरांच्या खरेदी- विक्रीचे मुख्य बाजार आहेत. हिरापूर येथील बाजार पंचेवीस वर्षापेक्षा अधिक काळापासून भरला जात असल्याने येथे जनावरांच्या खरेदी- विक्रीसाठी शेतकऱ्यांसह व्यापारी दूरदूरहून येतात. मंगळवारीही येथील बाजारात मोठी गर्दी दिसून आली.पावसाळा सुरू होऊन दोन महिने होऊन गेले तरी अद्यापही गेवराई तालुक्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. यामुळे शेतकऱ्यांकडे हिरवा चारा उपलब्ध झालेला नाही. तालुक्यात दुग्धोत्पादनाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर शेतकरी करतात. त्यामुळे गायी- म्हशी अनेक शेतकऱ्यांकडे आहेत. गेल्या काही दिवसात जरशी गायी पाळण्याचे प्रमाणही मादळमोही, चकलांबा, कोळगाव, तलवाडा, उमापूर या परिसरात वाढले आहेत. तसेच तालुक्यातील जवळपास वीस हजारांपेक्षा अधिक मजूर ऊसतोडणीसाठी जातात. या मजुरांकडेही बैलासह इतर पशुधन आहे. तर काही शेतकऱ्यांकडे शेतीला जोडधंदा म्हणून एखाद दुसरे पशुधन आहे. पाऊस नसल्याने शेतात हिरवा चारा उगवलेला नाही. त्यामुळे पशुधन घरीच सांभाळावे लागत आहे. गेल्या वर्षी अवकाळी पावसाने ज्वारीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे पुरेसा कडबाही उपलब्ध नाही. परिणामी कडब्याचे दर सध्या तीन ते साडेतीन हजार रुपये शेकडा असे झाले आहेत. या कडबा विकत घेऊन त्यावर पशुधन सांभाळणे शेतकऱ्यांना आर्थिक दृष्टया तोट्याचे ठरत आहे. तालुक्यात अशी परिस्थिती असल्याने मंगळवारी येथील बाजारात अनेक शेतकऱ्यांनी गाय, म्हैस, बैल आदी पशुधन विक्रीसाठी आणले होते. पशुधनाची आवक मोठ्या प्रमाणावर झाल्याने काही प्रमाणात दरही उतरले होते. यामुळे शेतकरी दोन्ही कडून संकटात आल्याचे शेतकरी रामराव काळे, वसंत पवळ, भीमराव चौरे यांनी सांगितले. (वार्ताहर)