विलास भोसले , पाटोदाभयंकर उष्णता आणी पाण्याच्या दुर्भिक्ष निर्माण झाल्याने वन्य प्राणी , पशुपक्षी नागरी वस्त्याकडे वळू लागले आहेत. ब्राम्हणवाडी गावकऱ्यांनी हरिणाला पाणी पाजून जीवदान दिले. तर पाचंग्री येथे पाण्याच्या शोधात एका मोराचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली.तालुक्यात भयंकर उष्णता वाढली आहे. पाण्याचे उद्भव आटू लागले आहेत. छावणीच्या माध्यमातून जनावरांना आणी टँकरच्या माध्यमातून नागरिकांना पाणी पुरवण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून होत आहे, असे असले तरी वन्यजीवांचे चारा पाण्यासाठी हाल होत आहेत. तालुक्यातील ब्राम्हणवाडी (पाचंग्री)या गावाच्या परिसरात हरिणांचे कळप चारा - पाण्यासाठी वन - वन भटकू लागले आहेत. मंगळवारी सकाळी भटकलेला एक हरणाचा कळप महादेव माळ परिसरात भटकत होता. त्यामधील सहा हरिण पाण्यासाठी व्याकूळ होऊन तडफडू लागले. हरिणाला ग्लानी आली होती. याबाबत वनविभागास कळवले. वनविभागाचे एल.बी.पवार, ए.एम. लांडगे, एम.एन.आघाव, अंबादास लवांडे यांनी हरिण ताब्यात घेऊन त्या हरणावर पुढील उपचार सुरू केले आहेत, असे ते म्हणाले.
हरणाला जीवदान; मोराचा मृत्यू
By admin | Updated: April 27, 2016 00:27 IST