शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद जिल्ह्यात ३४० मुलांना जीवनदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 23:59 IST

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जाते. या तपासणी मोहिमेंतर्गत सन २०१३ पासून जानेवारीअखेरपर्यंत जिल्ह्यात तब्बल ४७८ मुले हृदयरोगाने त्रस्त असल्याचे निदान झाले. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या पुढाकाराने यापैकी ३४० मुलांची हृदयाची शस्त्रक्रिया करण्यात आल्यामुळे नवे जीवन मिळाले, तर ७८१ मुलांवर अपेंडिक्स, हार्निया, व्यंग, कान, नाक, घसा, हाडे तसेच किडनीसह अन्य प्रकारच्या यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्दे२०१३ पासून : शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणी मोहिमेचे फलित

विजय सरवदे ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जाते. या तपासणी मोहिमेंतर्गत सन २०१३ पासून जानेवारीअखेरपर्यंत जिल्ह्यात तब्बल ४७८ मुले हृदयरोगाने त्रस्त असल्याचे निदान झाले. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या पुढाकाराने यापैकी ३४० मुलांची हृदयाची शस्त्रक्रिया करण्यात आल्यामुळे नवे जीवन मिळाले, तर ७८१ मुलांवर अपेंडिक्स, हार्निया, व्यंग, कान, नाक, घसा, हाडे तसेच किडनीसह अन्य प्रकारच्या यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.विद्यार्थ्यांचे आरोग्य उत्तम राहावे तसेच त्यांना चांगले जीवन जगता यावे, यासाठी सन २००८ पासून शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जाते. २०१३ साली या तपासणी मोहिमेचे ‘राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम’ असे नामांतर झाले. या कार्यक्रमांतर्गत वर्षातून दोन वेळा अंगणवाडीतील बालकांची, तर एक वेळेस शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जाते. एप्रिल २०१७ ते जानेवारीअखेरपर्यंत जिल्ह्यातील २,७८० शाळांपैकी २,५८१ शाळांमध्ये आरोग्य तपासणी करण्यात आली. शाळांमध्ये पहिली ते दहावीपर्यंतच्या ५ लाख १३ हजार ७५४ विद्यार्थ्यांपैकी २ लाख ९१ हजार ४२० विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यापैकी १ लाख ३४८ विद्यार्थ्यांवर औषधोपचार करण्यात आले.याशिवाय जिल्ह्यातील ३,४२७ अंगणवाड्यांपैकी जानेवारीअखेरपर्यंत १,९२५ अंगणवाड्यांमधील ०-६ वर्षे वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये ३ लाख २० हजार ७५ बालकांपैकी १ लाख ५० हजार ८२५ बालकांची आरोग्य तपासणी झाली. किरकोळ आजारी असलेल्या बालकांपैकी २१ हजार ५४ बालकांवर औषधोपचार करण्यात आले.चालू आर्थिक वर्षातील शालेय आरोग्य तपासणी मोहिमेत ४५ मुले हृदयरोगाने त्रस्त असल्याचे निदान झाले. अधिक निदान करण्यासाठी या मुलांची टूडी इको तपासणी करण्यात आल्यानंतर ‘महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजने’च्या माध्यमातून ३२ मुलांपैकी काहींच्या कमलनयन, धूत, एमजीएम हॉस्पिटलमध्ये, तर काहींच्या हृदयावर मुंबई, बंगळुरू येथील हॉस्पिटलमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. सन २०१३ पासून जानेवारी अखेरपर्यंत ४७८ हृदयरोगाने त्रस्त आढळून आलेल्या मुलांपैकी ३४० मुलांच्या हृदयाची शस्त्रक्रिया करण्यात आली. या आर्थिक वर्षामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा ग्रामीण रुग्णालये आणि उपजिल्हा रुग्णालयांमध्ये ४ हजार ६६० विद्यार्थ्यांना संदर्भित रुग्णसेवेसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी ३ हजार ९७७ मुलांवर औषधोपचार करण्यात आले.जिल्ह्यामध्ये ४२ पथके कार्यरत; अंगणवाडी, शाळांमध्ये तपासणीयासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जी.एम. गायकवाड म्हणाले की, या मोहिमेंतर्गत जिल्ह्यामध्ये ४२ पथके तैनात करण्यात आलेली असून, एका पथकात महिला व पुरुष, असे दोन डॉक्टर, एक फार्मासिस्ट व एक नर्स यांचा समावेश आहे. अंगणवाडी, शाळांमध्ये जाऊन ही पथके विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करतात.हृदयरोगाने त्रस्त मुलांचे प्रमाण हे आंतरराष्ट्रीय प्रमाणाएवढेच आहे. एक लाख बालकांमागे किमान १० बालके हृदयरोगाने आजारी असतात. शालेय विद्यार्थ्यांमध्ये नेहमी आढळून येणारे आरोग्यविषयक दोष शोधून काढणे, विद्यार्थ्यांमधील आजाराचे व मृत्यूचे प्रमाण कमी करणे आणि गंभीर आजारी विद्यार्थ्यांना संदर्भसेवा देणे, त्याचा पाठपुरावा करणे आणि आवश्यक वाटल्यास शस्त्रक्रिया करणे, हा या आरोग्य तपासणीचा उद्देश आहे.