शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण न करता थेट शोध

By admin | Updated: June 22, 2017 23:24 IST

हिंगोली : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत १०० टक्के मुले शाळेत दाखल करण्याची मोहीम शिक्षण विभागाकडून जोरात सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत १०० टक्के मुले शाळेत दाखल करण्याची मोहीम शिक्षण विभागाकडून जोरात सुरू आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी आता शिक्षण विभागातर्फे शाळाबाह्य मुलांचे आता सर्वेक्षण न करता त्यांचा शोध घेऊन त्यांना वयोगटानुसार तत्काळ शाळेत दाखल करून घेतले जाणार आहे. शिक्षणापासून एकही बालक वंचित राहणार नाही, याची खबरदारी शासनाकडून घेतली जात आहे. परंतु शाळाबाह्य मुलांची आकडेवारी निश्चित करताना अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे आता शिक्षण विभागाकडून मुलांचा शोध घेऊन त्यांना नियमित शाळेत दाखल करावे लागणार आहे. शिवाय या मुलांची सरल प्रणालीमध्ये नोंद करण्यात येणार आहे. दिलेल्या अहवालानुसार हिंगोली तालुक्यात १०१ शाळाबाह्य मुले आहेत, तर वसमत ५४, कळमनुरी ८१, औंढानागनाथ ५७ तसेच सर्वाधिक सेनगाव तालुक्यात ४४६ मुला-मुलींची संख्या आहे. ग्रामीण भागातील शाळेतील विद्यार्थी सतत गैरहजर राहत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यानुषंगाने सध्या शिक्षण विभागाकडून शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात टिकवून ठेवण्याची जबाबदारी आहे. एकही मुलगा शाळाबाह्य राहणार नाही, याची काळजी घेत या मुलांना शाळेत टिकवून ठेवण्यासाठी त्यांना आवडेल असे गुणवत्तापूर्वक शिक्षण देणे आवश्यक आहे. त्यानुसार शिक्षण विभागाकडून सध्या नियोजन केले जात आहे. शिवाय बैठका बोलावून संबधित यंत्रणेस मोहीम राबविण्याबाबत माहिती सांगितली जाणार आहे. शिवाय शाळेतील मुलींच्या गळतीकडे विशेष लक्ष दिले जाणार असून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्याचे उद्दिष्ट जिल्ह्याला देण्यात आले आहे.