लातूर : भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त ‘जिओ, जीने दो, भगवान महावीर की जय’ असा संदेश व जयघोष करीत सकल जैन समाजाच्या वतीने रविवारी सकाळी शहरात भगवान महावीर यांच्या प्रतिमेची पालखीसह शोभायात्रा काढण्यात आली़ जयघोषांनी परिसर दुमदुमून गेला होता. तसेच दिवसभर विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रम पार पडले़भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त शहरातील दिगंबर जैन मंदिरापासून सकाळी शोभायात्रेस प्रारंभ झाला़ ही शोभायात्रा पटेल चौक, खडक हनुमान, जीवनराज भवन, सेंट्रल हनुमान, दयाराम रोड, गंजगोलाई, हनुमान चौक या मार्गे चंद्रनगरातील वर्धमान उद्यानात पोहोचली़ तिथे या शोभायात्रेचा समारोप झाला़ दरम्यान, हभप गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते पंचरंगी ध्वजाचे ध्वजोराहण झाले़ यावेळी ‘भगवान महावीरांचे सिद्धांत’ या विषयावर गाढे अभ्यासक अमरचंद गुगालिया (यवतमाळ) यांचे व्याख्यान झाले़ (वृत्त हॅलो/२ वर)
‘जिओ, जीने दो’, ‘भगवान महावीर की जय’
By admin | Updated: April 9, 2017 23:25 IST