शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

‘प्रतिसाद’ला अल्प प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 01:04 IST

महाराष्ट्र पोलिसांच्या वतीने महिला सुरक्षिततेसाठी तयार केलेल्या ‘प्रतिसाद’ अ‍ॅपबाबत मात्र अनेक महिला व तरुणी अनभिज्ञ असल्याचे दिसून आले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सध्याचा जमाना स्मार्टफोनचा आहे. कामगार लोकांकडेही हल्ली स्मार्टफोन पाहायला मिळतात. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये तर स्मार्टफोनची प्रचंड ‘के्रझ’ आहे. ‘लेटेस्ट अ‍ॅप’ कोणते, हे ‘सर्च’ करून ते डाऊनलोड करण्यासाठी धडपडणाºया तरुणींची आणि महिलांचीही कमी नाही; मात्र असे असताना महाराष्ट्र पोलिसांच्या वतीने महिला सुरक्षिततेसाठी तयार केलेल्या ‘प्रतिसाद’ अ‍ॅपबाबत मात्र अनेक महिला व तरुणी अनभिज्ञ असल्याचे दिसून आले.महाविद्यालयीन तरुणी, महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांची सुरक्षितता डोळ्यासमोर ठेवून या अ‍ॅपची निर्मिती करण्यात आली असली तरी अडचणीत सापडलेल्या प्रत्येकालाच पोलिसांची तात्काळ मदत मिळावी, यासाठी हे अ‍ॅप सुरू करण्यात आले आहे.दीड वर्षापासून हे अ‍ॅप अस्तित्वात असूनही या अ‍ॅपबाबत मात्र बोटावर मोजण्याइतक्या लोकांनाच माहिती असल्याचे दिसून आले.संकटप्रसंगी या अ‍ॅपद्वारे जर कोणी पोलिसांना मदत मागितली तर त्या व्यक्तीचा पत्ता पोलिसांना ट्रेस होऊ शकतो आणि सात मिनिटांच्या आत त्या व्यक्तीला पोलिसांची मदत मिळू शकते, तसेच संकटग्रस्त व्यक्तीला जवळच्या पोलीस स्टेशनचा पत्ताही त्याद्वारे कळू शकतो. त्यासाठी त्या व्यक्तीच्या फोनवर इंटरनेट असणे आवश्यक असते.या अ‍ॅपचा उपयोग करून आतापर्यंत शहरातील किती व्यक्तींनी मदत मागितली, असे विचारले असता, संबंधित पोलीस अधिका-यांनी हा आकडा अत्यल्प असल्याचे सांगितले.अधिका-यांच्या मते अ‍ॅपचा उपयोग करण्यासाठी इंटरनेट सेवा उपलब्ध असणारा स्मार्टफोन असणे आवश्यक असल्यामुळे अनेक जणी अ‍ॅप डाऊनलोड करीत नाहीत; मात्र अनेक तरुणींना हे अ‍ॅप अस्तित्वात आहे हेच माहीत नाही. यावरूनच अ‍ॅपबाबत जनजागृती करण्यात यंत्रणा कमी पडत असल्याचे दिसूनयेते.