शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

गाव-तांड्यावरील साक्षरतेचे वर्ग झाले बंद !

By admin | Updated: June 29, 2014 00:37 IST

लातूर : साक्षरतेचे प्रमाण वाढविण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या साक्षर भारत अभियानातंर्गतच्या प्रेरकांचे मानधन गेल्या १७ महिन्यांपासून रखडले आहे़

लातूर : साक्षरतेचे प्रमाण वाढविण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या साक्षर भारत अभियानातंर्गतच्या प्रेरकांचे मानधन गेल्या १७ महिन्यांपासून रखडले आहे़ त्यामुळे प्रेरक आर्थिक अडचणीत सापडले असून गावा- गावांच्या ग्रामपंचायतीमध्ये रात्री भरणारे साक्षरतेचे केंद्र बंद झाले आहेत़१५ ते ६५ या वयोगटातील अशिक्षित, नवसाक्षर यांना साक्षर बनवून देशात साक्षरतेचे प्रमाण वाढविण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने सप्टेंबर २००९ पासून साक्षर भारत अभियान हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये राबविण्यास सुरुवात करण्यात आली़ यात मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद, बीड, परभणी, नांदेड, जालना, हिंगोली या सात जिल्ह्यांचा समावेश आहे़ प्रत्येक गावातील १० नवसाक्षरांसाठी एक स्वयंसेवक आणि सर्व नवसाक्षरांना शिक्षण देण्यासाठी एका प्रेरकाची निवड करण्यात आली होती़जिल्ह्यातील ७८७ गावांमध्ये १५७२ प्रेरकांची निवड करण्यात येऊन त्यांना दर तीन महिन्यांच्या नियुक्त्या निरंतर शिक्षण विभाकडून देण्यात येत होत्या़ प्रेरकांना मासिक दोन हजार रुपये मानधन देण्यात येते़ दररोज सायंकाळी दोन तास हे शिक्षणाचे वर्ग प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीत भरण्याच्या सूचना करण्यात आल्याने त्यानुसार वर्ग भरण्यात येऊ लागले़ तीन वर्षे हा उपक्रम राबवून त्याची पाहणी करण्यात आली असता शासनाच्या धोरणाप्रमाणे कारवाई झाली नसल्याने केंद्र शासनाने तीव्र नाराजी व्यक्त करीत पुन्हा सन २०१७ पर्यंत या अभियानास गेल्या वर्षी मुदतवाढ दिली़गेल्या वर्षी ही मुदत वाढ देण्यात आली असली तरी केंद्र शासनाकडून प्रेरक व इतर शैक्षणिक साहित्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला नाही़ त्यामुळे जिल्ह्यातील १५७२ प्रेरकांचे गेल्या १७ महिन्यांपासून मानधन रखडले आहे़ हे मानधन मिळावे म्हणून प्रेरकांकडून सतत मागणी केली जात आहे़ परंतु, अद्यापही शासनाकडून मानधन मिळाले नाही़ त्यामुळे दररोज रात्री गावांत भरणारे शिक्षण केंद्र बंद पडले आहेत़ (प्रतिनिधी)सर्वे राहिला अर्धवट़़़या प्रेरकांच्या मदतीने जिल्ह्यातील कुटुंबांची इत्थंभूत माहिती घेण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात सर्वे सुरु करण्यात आला होता़ मानधनच थकित राहिल्याने प्रेरकांनी हा सर्वे अर्धवट स्थितीत सोडून दिला आहे़ त्यामुळे शिक्षण केंद्र बंद पडण्याबरोबरच सर्व्हेही अपूर्ण राहिला आहे़ प्रेरकांचे मानधनासाठी हेलपाटे सुरु आहेत़केंद्र शासनाकडून निधी उपलब्ध झाला नसल्याने प्रेरकांचे मानधन रखडले आहे़ हे मानधन मिळावे म्हणून निरंतर शिक्षण विभागाच्या वतीने सातत्याने पाठपुरावा करण्यात येत असल्याची माहिती निरंतर शिक्षण विभागाच्या प्रभारी शिक्षणाधिकारी एस़ एस़ येलूरकर यांनी सांगितले़