शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

एसआरपीएफ भरतीत उमेदवारांची निवड यादी जाहीर

By admin | Updated: April 22, 2016 00:41 IST

हिंगोली : राज्य राखीव पोलिस बल गट क्र.१२ हिंगोली यांच्या आस्थापनेवरील पोलिस शिपायांच्या एकूण ५० रिक्त पदांकरीता १८ एप्रिल रोजी लेखी परीक्षा सुरळीत पार पडली.

हिंगोली : राज्य राखीव पोलिस बल गट क्र.१२ हिंगोली यांच्या आस्थापनेवरील पोलिस शिपायांच्या एकूण ५० रिक्त पदांकरीता १८ एप्रिल रोजी लेखी परीक्षा सुरळीत पार पडली. सदर लेखी परीक्षेतील गुणांआधारे उमेदवारांची अंतिम निवड यादी २१ एप्रिल रोजी जाहीर करण्यात आली आहे. गुणवत्तेच्या निकषाआधारे निवड यादीप्रमाणे पात्र उमेदवारांची लवकरच वैद्यकीय तपासणी होणार असल्याची माहिती भरतीप्रमुख अप्पर पोलीस अधीक्षक विवेक मासाळ यांनी दिली.हिंगोली येथे एसआरपीएफमध्ये पोलिस शिपायांच्या रिक्त पदांकरीता भरती प्रक्रिया पार पडली असून लेखी परीक्षेची अंतिम यादी जाहीर करण्यात आली आहे. लेखी परीक्षेस १०९९ उमेदवार पात्र ठरले होते. त्यापैकी १०६६ जणांनी परीक्षा दिली असून पात्र उमेदवारांची अंतिम यादी संबधित संकेतस्थळावर तसेच रा.रा.पो.बलगट क्र. १२ हिंगोली येथील मुख्य प्रवेशद्वारावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार पात्र उमेदवारांची वैद्यकीय तपासणी व चारित्र्य पडताळणी होणार आहे. निवड प्रक्रियेत उमेदवारांना काही आक्षेप असल्यास त्यांना २४ तासाचा कालावधी देण्यात आला होता. यासंबधी एकाही उमेदवाराने आक्षेप नोंदविला नाही. या भरतीसाठी प्रमुख म्हणून विवेक मासाळ, कोचर हे अधिकारी काम पाहत आहेत. जिल्हा पोलिस भरतीची अंतिम निवड यादीहिंगोली: जिल्हा पोलिस दलात १४ शिपायांच्या रिक्त पदांसाठी भरती घेण्यात आली. पात्र उमेदवारांची तात्पुरती अंतिम निवड यादी २१ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता जिल्हा पोलिस दलाच्या संबधित संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली. १४ रिक्त पदांसाठी घेण्यात आलेल्या भरतीत निवड यादीवर काही आक्षेप असल्यास २४ तासाच्या आत लेखी स्वरूपात कळविण्याचे आवाहन पोलिस अधिक्षक कैलास कणसे यांनी केले आहे. त्यानंतर आलेल्या आक्षेपाची नोंदणी केली जाणार नाही. त्यानंतर के व्हा ही निवड यादी लावण्यात येणार आहे. पोलिस अधिक्षक कैलास कणसे, अप्पर पोलिस अधिक्षक सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधिक्षक अनिलसिंह राजपूत, पंडीत राठोड, श्रीखंडे, आयुब पठाण, अप्सर पठाण, ज्ञानेश्वर सरोदे, अशोक धामने, ओमप्रकाश भुजबळ, जयप्रकाश झाडे आदींनी भरती प्रक्रियेसाठी परिश्रम घेतले.