शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

घाटी रुग्णालयातील ‘लिक्विड आॅक्सिजन’ लालफितीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 11:51 PM

लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : घाटी रुग्णालयातील सर्जिकल इमारतीमध्ये लिक्विड आॅक्सिजन सिस्टीम बसविण्यासाठी प्रशासनाने ६ कोटींचा प्रस्ताव तयार केला; ...

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : घाटी रुग्णालयातील सर्जिकल इमारतीमध्ये लिक्विड आॅक्सिजन सिस्टीम बसविण्यासाठी प्रशासनाने ६ कोटींचा प्रस्ताव तयार केला; परंतु वैद्यकीय शिक्षण सचिवांनी नव्या प्रस्तावांऐवजी हातात असलेले प्रकल्प पूर्ण करण्यावर भर देणार असल्याचे सांगितले. त्यामुळे हा प्रस्ताव लालफितीत अडकल्याने आगामी अनेक महिने सिलिंडर उचलून नेणे, त्याच्यावर लक्ष ठेवणे आणि संपल्यावर बदलण्याची कसरत कर्मचाºयांना करावीच लागणारआहे.घाटी रुग्णालयाच्या सर्जिकल इमारतीमध्ये शनिवारी आॅक्सिजन सिलिंडर बदलताना आवाज झाला आणि स्फोटाच्या अफवेने एकच गोंधळ उडाला; परंतु आॅक्सिजन पुरवठ्यातील हा काही पहिलाच गोंधळ नाही.यापूर्वी अनेक घटना घडल्या आहेत. घाटीत अत्याधुनिक आॅक्सिजन यंत्रणा (सेंट्रल आॅक्सिजन) बसविण्यात आली आहे; परंतु ही यंत्रणा अवघ्या काही वॉर्डांपुरती मर्यादित आहे. अनेक वॉर्डांत रुग्णास आॅक्सिजनची आवश्यकता भासल्यावर धावपळ करून आॅक्सिजन सिलिंडर लावला जातो. ‘घाटी रुग्णालय आॅक्सिजन सिलिंडरवर’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने १४ आॅगस्ट रोजी वृत्त प्रकाशित करून ही परिस्थिती समोरआणली.या वृत्ताची दखल घेत अखेर सर्जिकल इमारतीमध्ये लिक्विड आॅक्सिजन सिस्टीम बसविण्यासाठी प्रशासनाने तयारी केली. त्यामुळे सिलिंडरद्वारे आॅक्सिजन पुरवताना निर्माण होणारे धोके लवकरच कायमस्वरूपी संपुष्टात येईल,अशी अपेक्षा व्यक्त झाली. रुग्णालयात दर महिन्याला आॅक्सिजनवर सुमारे ६ लाखांवर खर्च होतो. यामध्ये लहान मोठे सिलिंडर आणि लिक्विड आॅक्सिजनच्या माध्यमातून ३० वॉर्डांत आॅक्सिजनचा पुरवठा करण्यात येतो. सिलिंडर उचलून नेणे, त्याच्यावर लक्ष ठेवणे आणि संपल्यावर बदलण्यासाठी मोठा ताण सहन करावा लागतो.सिलिंडरचा वापर तिपटीनेदोन वर्षांपूर्वी सर्जिकल इमारतीमधील आॅक्सिजन रुममध्ये सिलिंडरला जोडण्यात येणारा पाईप फुटल्याने गोंधळ झाला होता. आॅक्टोबरमध्ये ट्रॉमा केअर वॉर्डच्या सेंट्रलाइज आॅक्सिजन सिस्टीममध्ये तब्बल आठ दिवस आॅक्सिजन गळती झाली. या कालावधीत आॅक्सिजन सिलिंडरचा वापर तिपटीने वाढला. तसेच जम्बो सिलिंडर एका ठिकाणाहून दुसºया ठिकाणी हलविताना सिलिंडर पायावर पडून कर्मचारी जखमी होण्याच्या घटनाही झाल्या आहेत.प्रस्ताव २०१८ मध्येच लागणार मार्गीघाटीत ७ डिसेंबर रोजी जवळपास १५ वर्षांनंतर वैद्यकीय शिक्षण सचिवांनी भेट दिली. या भेटीमुळे घाटीचे प्रश्न मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली; परंतु नवीन प्रकल्प हाती घेण्याऐवजी सध्या सुरू असलेले प्रकल्प मार्गी लावण्यावर भर असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे सर्जिकल इमारतीतील लिक्विड आॅक्सिजन सिस्टीमच्या प्रस्तावासह अनेक प्रस्ताव आता २०१८ मध्येच मार्गी लागणार असल्याचे संकेत त्यांनी दिले. त्यामुळे आॅक्सिजन सिलिंडर हाताळणीतील प्रश्नांना घाटीला आणखी काही दिवस सामोरे जावे लागणार आहे.