शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

लिक्विड आॅक्सिजनची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 00:31 IST

घाटी रुग्णालयातील सर्जिकल इमारतीमध्ये लिक्विड आॅक्सिजन सिस्टीम बसविण्यासाठी प्रशासनाने अखेर तयारी केली आहे. त्यामुळे सिलिंडरद्वारे आॅक्सिजन पुरवताना निर्माण होणारे धोके कायमस्वरूपी संपुष्टात येतील, अशी अपेक्षा आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : घाटी रुग्णालयातील सर्जिकल इमारतीमध्ये लिक्विड आॅक्सिजन सिस्टीम बसविण्यासाठी प्रशासनाने अखेर तयारी केली आहे. त्यामुळे सिलिंडरद्वारे आॅक्सिजन पुरवताना निर्माण होणारे धोके कायमस्वरूपी संपुष्टात येतील, अशी अपेक्षा आहे.‘घाटी रुग्णालय आॅक्सिन सिलिंडरवर’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने १४ आॅगस्ट रोजी वृत्त प्रकाशित करून घाटीतील परिस्थिती समोर आणली. घाटी रुग्णालयात अत्याधुनिक आॅक्सिजन यंत्रणा (सेंट्रल आॅक्सिजन) बसविण्यात आली आहे; परंतु ही यंत्रणा अवघ्या काही वॉर्डांपुरती मर्यादित आहे. अनेक वॉर्डांत रुग्णास आॅक्सिजनची आवश्यकता भासल्यावर धावपळ करून आॅक्सिजन सिलिंडर लावला जातो. बालकक्षही सिलिंडरच्या जोरावर सुरू आहे. अनेकदा सिलिंडर पोहोचण्यास विलंब होतो. हा प्रकार रुग्णांच्या जीवावर बेतण्याचा धोका नाकारता येत नाही.घाटीतील मेडिसिन विभागात सेंट्रल आॅक्सिजन सिस्टीम आहे. येथे एका टँकमधून अतिदक्षता व आयसीसीयू, ‘एमआयसीयू’ला आॅक्सिजन पुरवठा केला जातो. सर्जिकल इमारतीमधील आॅपरेशन थिएटरमध्ये आॅक्सिजन पुरवठा करण्यासाठी एक टँक आहे. या दोन्ही टँकमध्ये लिक्विड आॅक्सिजनचा पुरवठा केला जातो. तेथून पाइपद्वारे रुग्णांना आॅक्सिजन पुरविला जातो. इतर ठिकाणी मात्र जम्बो सिलिंडर लावून पाइपद्वारे आॅक्सिजन दिले जाते. यामुळे वारंवार सिलिंडर काढून लावण्याची कसरत कर्मचाºयांना करावी लागते. थेट लिक्विड आॅक्सिजनच्या टँकमधून पुरवठा झाल्यास ही कसरत कमी होईल, अशी अपेक्षा कर्मचाºयांकडून व्यक्त होत होती. अखेर जागे झालेल्या घाटी प्रशासनाने त्यासाठी नियोजन केले आहे. लिक्विड आॅक्सिजन सिस्टीम बसविण्यासाठी दिल्ली येथील एका पथकाने गुरुवारी घाटीत पाहणी केली. लवकरच हे काम होईल, असे अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी सांगितले.