शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

लिप फास्टनर विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 00:30 IST

जिल्हा क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरू असलेल्या व्हेरॉक करंडक औद्योगिक क्रिकेट स्पर्धेत लिप फास्टनर संघाने एसजीएसटी संघावर ७४ धावांनी मात केली.

औरंगाबाद : जिल्हा क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरू असलेल्या व्हेरॉक करंडक औद्योगिक क्रिकेट स्पर्धेत लिप फास्टनर संघाने एसजीएसटी संघावर ७४ धावांनी मात केली. दुसºया सामन्यात स्कोडा संघाने हायकोर्ट संघावर तब्बल ९१ धावांनी दणदणीत विजय नोंदवला. आज झलेल्या सामन्यात राजू मदन आणि मंगेश गरड सामनावीर किताबाचे मानकरी ठरले. इंद्रजित उढाण आणि सय्यद शुजा याची अर्धशतकी खेळी हेदेखील आजच्या दिवसाचे वैशिष्ट्य ठरले.आज सकाळच्या सत्रातील लढतीत स्कोडा सांने १९.२ षटकांत सर्वबाद १५० धावा केल्या. त्यांच्याकडून मंगेश गरड याने नवव्या क्रमांकावर फलंदाजी करताना ३४ चेंडूंत २ षटकार व ५ चौकारांसह सर्वाधिक ४८ धावा केल्या. संदीप खोसरेने २७ व संदीप राठोडने १८ धावा केल्या. हायकोर्ट संघाकडून देवानंद नांदेडकरने ३ तर सचिन जैस्वाल व मनोज शिंदे यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात हायकोर्ट संघ १० षटकांत ५९ धावांत गारद झाला. त्यांच्याकडून अमित वायकोस (१७) सचिन जैस्वाल (१४) हेच दुहेरी आकडी धावा पार करू शकले. स्कोडा संघाकडून योगेश भागवत, पवन कवाले व संदीप खोसरे यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.दुसºया सामन्यात लिप फास्टनरने प्रथम फलंदाजी करताना २ बाद १८५ धावा ठोकल्या. त्यांच्याकडून राजू मदन याने ५३ चेंडूंत १२ चौकारांसह ८१, इंद्रजित उढाणने ५३ चेंडूंत ७ चौकार व एका षटकारासह ८१ धावा केल्या. प्रणव राजळेने १५ व राहुल पाटीलने १० धावांचे योगदान दिले. प्रत्युत्तरात एसजीएसटी संघ ६ बाद १२२ पर्यंतच मजल मारू शकला. त्यांच्याकडून सय्यद शुजाने एकाकी झुंज देताना ६५ चेंडूंत १० चौकारांसह ६८ धावांची खेळी केली. अभय करमारकरने १६ धावा केल्या. लिप फास्टनरकडून प्रणव राजळे याने २३ धावांत ३ गडी बाद केले. राजू मदन, राहुल पाटील व इंद्रजित उढाण यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.