शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

लायन्स क्लबची शताब्दी वर्षपूर्ती : ‘लायन्स’चे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष नरेश अग्रवाल यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 01:59 IST

लायन्स क्लब इंटरनॅशनलचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष डॉ. नरेश अग्रवाल यांचा शहरवासीय व लायन्स परिवारातर्फे गुरुवारी जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. ‘माझे तन पुलकित झाले, मन भावविभोर झाले आणि कंठातून उच्चार बाहेर पडत नाही.

औरंगाबाद : लायन्स क्लब इंटरनॅशनलचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष डॉ. नरेश अग्रवाल यांचा शहरवासीय व लायन्स परिवारातर्फे गुरुवारी जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. ‘माझे तन पुलकित झाले, मन भावविभोर झाले आणि कंठातून उच्चार बाहेर पडत नाही. असा भव्य नागरी सत्कार मी पहिल्यांदाच अनुभवत आहे,’ अशा शब्दांत अग्रवाल यांनी शहरवासीयांचे आभार मानले.२१० देशांमध्ये लायन्स क्लब इंटरनॅशनलचे सेवाकार्य सुरू आहे. लायन्सने शताब्दी वर्ष यशस्वीपणे पूर्ण करून गुरुवारी शतकोत्तर पहिल्या वर्षात पाऊल टाकले. या ऐतिहासिकसमयी लायन्सचे आंतरराष्ट्रीय अध्यक्षपद भूषविण्याचा मान नरेश अग्रवाल या भारतीय उद्योजकांना मिळाला. आंतरराष्ट्रीय अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच अग्रवाल औरंगाबादेत आले होते. यानिमित्ताने लायन्स परिवार व औरंगाबादवासीयांतर्फे सकाळी तापडिया नाट्यमंदिरात त्यांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात आला.महापौर भगवान घडामोडे व ‘लोकमत’चे एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा यांनी नरेश अग्रवाल यांना शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. सत्काराला उत्तर देताना अग्रवाल म्हणाले की, हा नरेश अग्रवाल यांचा सत्कार नव्हे, हा सन्मान भारतीय तिरंग्याचा आहे. मी ज्या देशांमध्ये लायन्सचा आंतरराष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जातो तेथे प्रथम आपले राष्ट्रगीत म्हटले जाते. मला अभिमान वाटतो, मी हिंदुस्थानी असल्याचा.जगभरात सेवाकार्य करण्यासाठी लायन्सने आपली संख्या व ताकद वाढविली पाहिजे. सध्या देशात २ लाख ३५ हजार लायन्स आहेत.येत्या काळात नवीन सदस्यांची संख्या ५ लाखांपर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट त्यांनी सर्व लायन्स सदस्यांसमोर ठेवले. त्यास सर्वांनी हात उंच करून होकार दिला.तत्पूर्वी अवघ्या ५१ दिवसांत नवीन २३ क्लब व ५५५ नवीन सदस्य केल्याबद्दल प्रांतपाल संदीप मालू यांचा गौरव करण्यात आला. तसेच माजी आंतरराष्ट्रीय संचालक नरेंद्र भंडारी यांनी नवीन सदस्यांना शपथ दिली.१०० किलोचा केक व धान्यतुलाशताब्दी वर्षानिमित्त आंतरराष्ट्रीय अध्यक्ष डॉ. नरेश अग्रवाल यांची धान्यतुला करण्यात आली. हे धान्य इस्कॉनच्या अन्न अमृत योजनेत देण्यात आले. या वेळी शाळेतील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत १०० किलोचा केक कापण्यात आला. हा केक शहरातील अनाथालय, वृद्धाश्रम, दिव्यांगांच्या आश्रमांना वाटण्यात आला.