शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

लायन्स क्लब आॅफ आयकॉन्सने स्वीकारले १५१ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व

By admin | Updated: August 31, 2014 00:43 IST

औरंगाबाद : लायन्स क्लब आॅफ औरंगाबाद आयकॉन्सने १५१ गुणवंत विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारले आहे.

औरंगाबाद : लायन्स क्लब आॅफ औरंगाबाद आयकॉन्सने आर्थिकदृष्ट्या गरीब असलेल्या १५१ गुणवंत विद्यार्थ्यांचे १० वर्षांसाठी पालकत्व स्वीकारले आहे. शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते शालेय साहित्याचे वाटप करून या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. शहरातील आयएमए सभागृह येथे आयोजित कार्यक्रमात लायन्स क्लब आॅफ औरंगाबाद आयकॉन्सचे अध्यक्ष भास्कर चौधरी, राजेश राऊत, एम.के. अग्रवाल, महावीर पाटणी, तनसुख झांबड, भावेश पटेल, सचिन पहाडे, अजय बजाज, प्रकल्पप्रमुख अमित कुलकर्णी आणि जयदीप घुगे आदींसह लायन्स क्लब आॅफ औरंगाबादच्या पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.याप्रसंगी शालेय शिक्षणमंत्री म्हणाले की, अनेक विद्यार्थ्यांजवळ गुणवत्ता असतानाही आर्थिक परिस्थितीमुळे आपले स्वप्न पूर्ण करणे शक्य होत नाही. अशा वेळी त्यांना आर्थिक आधाराची मोठी गरज असते. लायन्स क्लब आॅफ औरंगाबाद आयकॉन्सने १५१ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारून त्यांना त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत केली आहे. शैक्षणिक क्षेत्राद्वारे भवितव्य घडवू पाहणाऱ्या या विद्यार्थ्यांच्या पंखांना एका अर्थाने बळ देण्याचे कार्य या संस्थेकडून घडत आहे. लायन्स क्लब आॅफ औरंगाबाद आयकॉन्सचा आदर्श घेऊन अनेक सामाजिक संस्था या कार्यासाठी पुढे येतील याची मला खात्री आहे.अभ्यासक्रमाविषयी बोलताना ना. राजेंद्र दर्डा यांनी विद्यार्थ्यांना नववीपासून व्यावसायिक शिक्षण देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने नुकताच घेतला असल्याचे नमूद केले. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना इतर विषयांसह एका विशिष्ट विषयात पारंगत होऊन आपले भवितव्य घडविता येणार आहे.येणाऱ्या काळात डीएमआयसीच्या रूपाने मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होणार असल्याने रोजगाराची चिंता न करता मन लावून अभ्यास करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले. प्रारंभी, या महत्त्वाकांक्षी उपक्रमाविषयीचे प्रास्ताविक संदीप मालू यांनी केले. त्यानंतर ना. राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते १५१ विद्यार्थ्यांना शैक्षणिक कीटचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी रवी खिंवसरा, राजेंद्र राजपाल, सी.एस. जरीवाला, रश्मी नायर, संजीव सोनार आदींसह लायन्सचे सदस्य, विद्यार्थी व पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास लंके यांनी केले.