लातूर : बायोमेट्रिक प्रणाली स्वस्त धान्य दुकानात येणार असल्याने रेशनकार्ड आधारकार्डशी लिंक करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे़ ४ लाख ४७ हजार ६३२ वेगवेगळे रेशनकार्ड आहेत़ या रेशनकार्डचे संकलन सुरु असून, आतापर्यंत ४२ हजार ९४ रेशनकार्ड आधारशी लिंक केले आहेत़ शिवाय, कुटुंब प्रमुखांचे बँक खातेही आधारकार्डशी लिंक करण्यात येत आहेत़ ९७ हजार १३० बँक खात्यापैकी ५५ हजार ७०४ खाते क्रमांक आधारशी लिंक केले आहेत़ जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीने जिल्हाभर ही मोहीम हाती घेण्यात आली आहे़ स्वस्त धान्याची सार्वजनिक वितरण व्यवस्था संगणकीकरण करण्यास वेग आला असून, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनीलकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांची बैठक घेण्यात आली असून, सध्या तालुकानिहाय बैठका घेण्यात आल्या आहेत़ शासनाच्या धोरणानुसार पीडीएस डाटा बेसमध्ये आधारक्रमांकाची नोंद करण्यात येत आहे़ यासाठी प्री-प्रिंटेड प्रपत्र हस्तगत करुन बँक खाते क्रमांक, बँकेचे नाव, बँक शाखा व पत्ता, आयएफएस सी कोड क्रमांक, आधारकार्ड क्रमांक किंवा आधार नोंदणी क्रमांक आदी माहिती घेण्यात येत आहे़ जिल्ह्यात ४ लाख ४७ हजार ६३२ शिधापत्रिकाधारक असून, ही त्यांची आधारशी लिंकींग होत आहे़ त्यासाठी ७४ हजार ४२० आधारकार्डचे संकलन झाले आहे़ ४२ हजार ९४ आधारकार्डची लिंकींगही झाली आहे़ तर ९७ हजार १३० बँक खाते संकलित झाले असून, ५५ हजार ७०४ खाते क्रमांक आधारकार्डशी लिंक केले आहेत, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सुनीलकुमार यादव यांनी दिली़
४२ हजार रेशनकार्ड ‘आधार’शी लिंक
By admin | Updated: May 13, 2015 00:27 IST