शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जालना शहरात एलईडीचा प्रकाश पडेना

By admin | Updated: October 11, 2016 23:59 IST

जालना : नगर पालिकेने लाखो रूपये खर्च करून शहरभर एलईडी दिवे बसविण्याचा निर्णय घेतला. मात्र काही ठराविक भाग वगळता शहर अद्यापही अंधारातच चाचपडत आहे.

जालना : नगर पालिकेने लाखो रूपये खर्च करून शहरभर एलईडी दिवे बसविण्याचा निर्णय घेतला. मात्र काही ठराविक भाग वगळता शहर अद्यापही अंधारातच चाचपडत आहे. त्यामुळे या दिव्यांचा सर्वदूर प्रकाश पडणार की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.शहरातील पथदिवे दोन ते तीन वर्षांपासून बंद होते. याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागला. अंधारामुळे चोऱ्यांचे प्रमाणही वाढले होते. अनेक संघटनांनीही याबाबत आंदोलन केले होते. पथदिव्यांचे दहा कोटी रूपयांची थकबाकी भरण्यासाठी नगर पालिकेकडे पैसे नसल्याने ते दिवे बंदच होते आताही बंदच आहेत. नगर पालिका व पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी पुढाकार घेऊन एलईडी दिवे बसविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सुमारे १५ हजार दिवे बसविण्याच निर्णय घेण्यात आला. काही दिवसांतच संपूर्ण शहर एलईडीने उजळेल असा पालिकेच्या अधिकाऱ्यांचा होरा होता. मात्र तो फोल ठरला. गणपती विसर्जन मार्ग वगळता अन्य भागात एलईडी दिवे कधी लागणार याबाबत कोणीच काही सांगत नाही. पालिकेचे विद्युत अभियंता दिवे लवकरच लागतील असे साचेबद्ध उत्तर देतात. नगर पालिकेडे पथदिव्यांच्या थकबाकी पोटी सुमारे दहा कोटी रूपये थकित आहेत. वीज बिलांत सवलत मिळावी म्हणून महावितण कंपनीने अनेकदा संधी दिली, मात्र पालिकेला अद्यापही शक्य झालेले नाही. एलईडी दिवे सुरू करण्यासाठी पालिकेने एक कोटी रूपये भरून तात्पुरत्या स्वरूपात वीजपुरवठा सुरू केला आहे. मात्र मूळ रक्कम अद्यापही वाढत आहे. शहरातील गांधीचमन ते मुक्तेश्वर वेस वगळता अन्यत्र नवीन एलईडी दिवे बसविल्याचे दिसून येत नाही. अग्रसेन चौक ते बसस्थानक दरम्यान एलईडी दिवे बसविण्यात असले तरी ते वर्षभरापूर्वी बसविण्यात आले आहेत. त्यामुळे पंधरा हजार दिवे कोठे बसविणार अथवा बसले याबाबत काहीच ताळमेळ नाही. नगर पालिकेने प्रभाग निहाय तसेच मुख्य रस्त्यांवर एलईडी दिवे लावून दिवाळीपूर्वी शहर लखलखीत करण्याची मागणी होत आहे.