शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
4
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
5
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
6
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
7
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
8
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
9
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
10
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
11
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
12
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
13
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
14
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
15
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
16
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
17
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
18
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
19
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
20
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'

औट्रम घाटातून १५ सप्टेंबरनंतर हलक्या वाहनांना परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:05 IST

औरंगाबाद : कन्नड ते चाळीसगाव दरम्यान असलेला औट्रमघाट सध्या तरी सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी सुरळीत होण्याची शक्यता नाही. १५ सप्टेंबरनंतर ...

औरंगाबाद : कन्नड ते चाळीसगाव दरम्यान असलेला औट्रमघाट सध्या तरी सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी सुरळीत होण्याची शक्यता नाही. १५ सप्टेंबरनंतर कार, दुचाकी व इतर हलकी वाहने घाटातून जाऊ शकतील, या दिशेने नॅशनल हायवे ॲथॉरिटी ऑफ इंडिया प्रयत्न करीत आहे. जड वाहनांची वाहतूक सध्या नांदगावमार्गे वळविण्यात आली आहे. भोपाळ येथून तज्ज्ञ अभियंत्यांचे पथक औरंगाबादमध्ये येणार असून, ते घाटातील भिंत उभारण्याच्या कामासाठी तांत्रिक सल्ला देणार आहेत. त्यानंतर घाट पूर्ववत करण्यासाठी सुरू असलेल्या कामाला वेग येईल. मंगळवारी प्रकल्प संचालक अरविंद काळे व अभियंत्यांनी घाटात सुरू असलेल्या कामाची पाहणी करून कामाचा आढावा घेतला.

नॅशनल हायवे क्रमांक २११ वरील औरंगाबाद ते धुळे या मार्गावर असलेल्या कन्नड व चाळीसगाव दरम्यान औट्रमघाटात ३१ ऑगस्ट रोजी झालेल्या पावसामुळे दरड कोसळली. तेव्हापासून घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. २०१७ च्या पावसाळ्यात झालेल्या ७० मि.मी. पावसाच्या तडाख्याने घाटात साडेतीन मीटरपर्यंतचे भूस्खलन होऊन दरड कोसळली. २०१८, २०१९ आणि २०२० मध्येही कमी-अधिक प्रमाणात दरड कोसळण्याच्या घटना घडल्या. २०२१ मध्ये तर साडेपाच मीटरहून अधिक भूस्खलन झाले.

प्रकल्प संचालकांनी दिलेली माहिती अशी

कार व दुचाकीची वाहतूक सुरू होईल, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. घाट दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. पुढील काही दिवस पाऊस सुरू राहणार असल्याचा अंदाज आहे. १५ सप्टेंबरपर्यंत घाटातील काम पूर्ण करण्याचा प्रयत्न आहेत. हलक्या वाहनांची वाहतुक सुरू होईल, असे एनएचएआयचे प्रयत्न आहेत. सीडी वर्कचे काम पूर्ण झाल्यानंतरच वाहतुक सुरळीत करणे शक्य होणार आहे. बुधवारी भोपाळचे तज्ज्ञ येणार आहेत. घाटात २५ मीटर उंचीची भिंत बांधावी लागणार आहे. त्याचे डिझाइन कसे असेल, भिंत कशी बांधावी लागेल, याबाबत ते तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर काम आणखी गतीने करण्यात येणार आहे, असे एनएचएआयचे प्रकल्प संचालक अरविंद काळे यांनी सांगितले.