शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

खड्ड्यातून स्वेच्छा निधीवर उड्या

By admin | Updated: August 11, 2016 01:25 IST

औरंगाबाद : शहरातील सर्व प्रमुख रस्ते, अंतर्गत रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. एकही रस्ता चांगला राहिलेला नाही. खड्ड्यांमुळे सर्वसामान्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो.

औरंगाबाद : शहरातील सर्व प्रमुख रस्ते, अंतर्गत रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. एकही रस्ता चांगला राहिलेला नाही. खड्ड्यांमुळे सर्वसामान्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. मनपा अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी एक दिवस दुचाकीवर संपूर्ण शहर फिरून बघावे. वॉर्डांमधील छोटे रस्ते चिखलमय झाले असून, किमान मुरूम तरी टाका, असे एक ना अनेक प्रश्न बुधवारी मनपाच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी उपस्थित केले. खड्ड्यांच्या मुद्यावर प्रशासनाला जाब विचारण्याचा मुद्या बाजूला ठेवून नगरसेवकांनी स्वेच्छा निधीतून २५ हजारांची थेट ‘फुटकळ’कामे करण्यास मुभा द्या म्हणून संपूर्ण सभागृह डोक्यावर घेतले.मनपाच्या सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी शहरातील खड्ड्यांचा मुद्या उपस्थित केला. नगरसेवक बापू घडामोडे, माधुरी अदवंत, राजगौरव वानखेडे, विजय औताडे, शेख नवीद आदींनी औरंगाबादकरांना होणाऱ्या त्रासाबद्दल सविस्तर कथन केले. प्रत्येक नगरसेवकाने आपापल्या भागातील रस्त्यांची दयनीय अवस्था नमूद केली. आॅक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात औरंगाबादेत आंतरराष्ट्रीय सार्क परिषद होणार आहे. यानिमित्त येणारे विदेशी पाहुणे खड्डे पाहून अवाक होतील. लवकरच गणेशोत्सव येत आहे. गणपती बाप्पांना खड्ड्यातून नेणार का, असाही प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला.नगरसेवकांच्या भावना ऐकून क्षणभर प्रशासनही अवाक झाले होते. खड्ड्यांच्या मुद्यावर सर्व नगरसेवकांनी प्रशासनाची कमालीची कोंडी केली. प्रशासनाकडून काम होत नसेल तर स्पष्टपणे सांगून टाकावे. आम्ही स्वखर्चाने खड्डे बुजवून घेऊ असेही छातीठोकपणे काही नगरसेवकांनी सांगून प्रशासनाची धडधड अधिक वाढविली.मनपा आयुक्तांची विषयाला बगल...खड्ड्यातून अचानक नगरसेवकांनी स्वेच्छा निधीवर उड्या मारल्या. मागील दीड वर्षापासून वॉर्डांमध्ये एक रुपयाचेही काम झाले नाही. छोटी-छोटी कामे करण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने २५ हजार रुपयांची ए-१ ची कामे बंद केली आहेत. या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. नगरसेवकांना आपल्या वॉर्डात ७ लाख रुपये ‘स्वेच्छा’ निधी विनानिविदा वापरण्याची मुभा द्यावी, अशी मागणी सुरू केली. नगरसेवक विजय औताडे, रामेश्वर भादवे, गंगाधर ढगे, राजगौरव वानखेडे, ऋषी खैरे आदींनी प्रशासनावर हल्लाबोल केला. स्वेच्छा निधी आमच्या हक्काचा आहे. आम्ही हा निधी फुटकळ कामांसाठी वापरू शकतो. प्रशासनाने फक्त आदेश द्यावेत. आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी यासंदर्भात नियमावली तयार करण्याचे आश्वासन देऊन विषयाला सफाईदारपणे बगल दिली.