शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी जीवघेणी कसरत

By admin | Updated: June 27, 2014 00:15 IST

शिरडशहापूर : औंढा नागनाथ तालुक्यातील लक्ष्मण नाईक तांडा येथे नियोजन नसल्याने ग्रामस्थांना पावसाळ्यातसुद्धा पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

शिरडशहापूर : औंढा नागनाथ तालुक्यातील लक्ष्मण नाईक तांडा येथे नियोजन नसल्याने ग्रामस्थांना पावसाळ्यातसुद्धा पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ग्रामपंचायतीने पाण्याचा प्रश्न सोडविण्याकडे दुर्लक्ष केल्याने नाराजी व्यक्त होत आहे.डोंगराळ भाग असलेल्या लक्ष्मण नाईक तांडा परिसरामध्ये दरवर्षी उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण होते; परंतु गेल्यावर्षी मुबलक प्रमाणात पाऊस झाल्याने यावर्षी पाण्याची टंचाई जाणवली नाही. गेल्या काही दिवसांपासून गावातील विहिरींची पाणीपातळी खालावल्याने पाण्याबाबत ही भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. लक्ष्मण नाईक तांडा या गावासाठी १५ वर्षापासून पाणीटंचाई निवारणार्थ शासनाकडून ३ योजना राबविल्या गेल्या. यामध्ये जलस्वराज्य प्रकल्प, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व आमदार फंडातून या योजनेवर जवळपास ५० लाख रूपये खर्च झाले असून सुद्धा लक्ष्मण नाईक तांडा येथील ग्रामस्थांना जीव मुठीत घेवून विहिरीवरून पाणी भरावे लागत आहे.जलस्वराज्य प्रकल्पाच्या विहिरीत मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे; परंतु या योजनेत पाईपलाईनचे काम बरोबर झाले नसल्यामुळे गावापर्यंत पाणीच पोहोचत नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही योजना बंद पडली आहे. या गावातील सार्वजनिक विहिरीवरून संपूर्ण गावाला पाणी भरावे लागते. गेल्या आठवड्यात पाणी काढत असताना एका तरुणाचा तोल गेल्याने याच विहिरीत पडून त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. एवढी मोठी घटना घडून सुद्धा प्रशासनाने पाणी प्रश्न सोडविलेला नाही, हे विशेष. (वार्ताहर)