शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

अज्जू बिल्डरचा खून करणा-या दोघांना जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 00:59 IST

महापालिकेच्या निवडणुकीतील वादातून अज्जू बिल्डर यांचा खून करणारे आरोपी शेख अय्युब ऊर्फ बाबा शेख कादर व शेख अकबर शेख कादर या दोघांना सत्र न्यायाधीश जयंत राजे यांनी जन्मठेपेची शिक्षा व पाच हजार रुपये दंड शुक्रवारी (दि. ८ फेब्रुवारी) ठोठावला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महापालिकेच्या निवडणुकीतील वादातून अज्जू बिल्डर यांचा खून करणारे आरोपी शेख अय्युब ऊर्फ बाबा शेख कादर व शेख अकबर शेख कादर या दोघांना सत्र न्यायाधीश जयंत राजे यांनी जन्मठेपेची शिक्षा व पाच हजार रुपये दंड शुक्रवारी (दि. ८ फेब्रुवारी) ठोठावला. २२ एप्रिल २०१३ रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास इंदिरानगर-बायजीपुरा परिसरातील नूर मशिदीमध्ये नमाज पढून अज्जू बिल्डर दुचाकीवर निघाले असता, त्यांना अडवून त्यांच्यावर लाठ्या-काठ्या-तलवारीने गंभीर स्वरुपाचा हल्ला करण्यात आला होता. अज्जू बिल्डर खाली पडले असता, त्यांचा दगडाने ठेचून खून करण्यात आला होता. त्यावेळी अज्जू बिल्डरचा भाऊ शेख अथर मदतीसाठी धाऊन आला असता, त्यालाही जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. हल्ल्यानंतर अज्जू बिल्डरला खाजगी रुग्णालयात दाखल केले असता, मृत घोषित करण्यात आले होते.यासंदर्भात जिन्सी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर दुस-याच दिवशी शेख अय्युब ऊर्फ बाबा शेख कादर (२४), शेख अकबर शेख कादर (२८), मुश्ताक सय्यद पाशा (३६) आणि शेख कादर शेख दाऊद (५१, सर्व रा. इंदिरानगर-बायजीपुरा) यांना अटक करण्यात आली होती. तेव्हापासून ते अटकेत होते. पोलीस निरीक्षक जी. एस. पाटील यांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केले होते.सुनावणीअंती न्यायालयाने आरोपी शेख अय्युब ऊर्फ बाबा शेख कादर व आरोपी शेख अकबर शेख कादर यांना भा.दं.वि. कलम ३०२ अन्वये जन्मठेप व पाच हजार रुपये दंड ठोठावला. तसेच कलम ३२३ अन्वये सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. इतर दोन आरोपींना सबळ पुराव्याअभावी निर्दोष सोडले. सहायक सरकारी वकील शिरसाठ यांना अ‍ॅड. नितीन मोने, पैरवी अधिकारी उत्तम तायडे आणि पोलीस उपनिरीक्षक शेळके यांनी सहकार्य केले.