शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीचा जाळून खून करणाऱ्यास जन्मठेप व दंड

By admin | Updated: September 15, 2015 00:35 IST

औरंगाबाद : किरकोळ कारणावरून पत्नी बेबीबाई हिचा जाळून खून करणारा तिचा पती सुरेश बाबू गिरी (५०) याला सत्र न्यायाधीश यू.एल. तेलगावकर यांनी

औरंगाबाद : किरकोळ कारणावरून पत्नी बेबीबाई हिचा जाळून खून करणारा तिचा पती सुरेश बाबू गिरी (५०) याला सत्र न्यायाधीश यू.एल. तेलगावकर यांनी जन्मठेपेची शिक्षा आणि दोन हजार रुपये दंड ठोठावला. सुरेश गिरी हा पत्नी बेबी, मुलगा रमेश आणि मुलगी माया यांच्यासह राजनगर, मुकुंदवाडी येथे राहत होता. १८ सप्टेंबर २०१२ रोजी रात्री १०.३० ते ११ वाजेदरम्यान बेबीबाई स्वयंपाक करीत होती. त्यावेळी तिचा पती सुरेश दारू पिऊन आला. आपली मुलगी माया हिची सोयरीक बेबीने तिच्या माहेरच्या नात्यात गावाकडे का जमविली. मला मुलगी तेथे द्यायची नाही, असे म्हणून सुरेश पत्नीला शिवीगाळ करू लागला. त्यावर बेबीबाई म्हणाली की, मुलगा चांगला आहे. मला मुलगी तेथेच द्यायची आहे. यावरून दोघांत वाद झाला. सुरेशने बेबीला मारहाण करून ‘तुला मारूनच टाकतो, जाळून टाकतो’ असे म्हणून स्टोव्हमधील रॉकेल तिच्या अंगावर ओतून पेटवून दिले. बेबीने आरडाओरड केल्यानंतर सुरेश पळून गेला, तर आईचा आवाज ऐकून छतावर झोपलेला मुलगा आणि मुलगी खाली आले. मुलगा रमेश (२०) याने आईच्या अंगावर रग टाकून विझविण्याचा प्रयत्न केला. रमेशने सर्व नातेवाईकांना फोन करून घटनेविषयी माहिती दिली. बेबीबाई ६० टक्के भाजली होती. तिचा मुलगा, मुलगी आणि शेजारी गोरखनाथ जाधव यांनी बेबीबाईला एका खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. तेथे पोलीस जमादार ए.आर. बिघोत यांनी तिचा जबाब नोंदविला असता तिने वरीलप्रमाणे हकिकत सांगितली. यावरून सुरेशविरुद्ध भा.दं.वि. कलम ३०७ आणि ५०४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक अमित घुले यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून स्टोव्ह, रॉकेलची कॅन आणि कपड्याचे तुकडे जप्त केले. दुसऱ्या दिवशी विशेष न्यायदंडाधिकारी स.मु. गोखले यांनी पुन्हा बेबीबाईचा जबाब नोंदविला. त्यावेळीही तिने वरीलप्रमाणेच हकिकत सांगितली. १९ सप्टेंबर २०१२ रोजी बेबी मरण पावली. त्यावरून सुरेशविरुद्ध भा.दं.वि. कलम ३०२ अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपासाअंती पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनावणीच्या वेळी अतिरिक्त लोकअभियोक्ता राजेंद्र पी. मुगदिया यांनी एकूण १० साक्षीदारांचे जबाब नोंदविले. त्यापैकी आरोपीचा मुलगा, मुलगी व इतर दोन, असे एकूण चार साक्षीदार फितूर झाले. बिघोत, गोखले आणि जाधव यांचे जबाब महत्त्वाचे ठरले.