शहरं
Join us  
Trending Stories
1
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
2
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
3
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
4
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
5
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
6
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
7
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
8
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
9
Manisha Kayande: एकनाथ शिंदे केवळ भाषणच...; कार्यकर्त्यांसमोर मनीषा कायंदेंनी मनातलं बोलून दाखवलं!
10
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
11
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
12
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
13
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
14
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
15
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
16
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
17
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
18
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
19
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
20
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली

मुलींसाठी शहरात ग्रंथालय उभारणार

By admin | Updated: June 19, 2014 00:18 IST

नांदेड : मराठा समाजातील सामाजिक प्रबोधन व शिक्षणातील दर्जा सुधारावा, यासाठी लवकरच जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून शहरात ग्रंथालय आणि अभ्यासिका सुरू करणार असल्याची

नांदेड : मराठा समाजातील सामाजिक प्रबोधन व शिक्षणातील दर्जा सुधारावा, यासाठी लवकरच जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून शहरात ग्रंथालय आणि अभ्यासिका सुरू करणार असल्याची माहिती जिजाऊ ब्रिगेडच्या महानगराध्यक्षा डॉ़ रेखा पाटील यांनी दिली़ जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने विजयनगर येथे राजमाता जिजाऊ मॉ साहेबांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला़ कार्यक्रमात डॉ़ पाटील बोलत होत्या़ प्रारंभी राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे लक्ष्मी गोरे, सुशीला पाटील, संगीता डक पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले़ यानंतर जिजाऊवंदना घेण्यात आली़ डॉ़ पाटील म्हणाल्या, ग्रामीण भागातील मराठा समाजातील मुली शिक्षणामध्ये हुशार आहेत, मात्र त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्या पुढील शिक्षण घेवू शकत नाहीत़ दहावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील बहुतांश शेतकरी, शेतमजूर, कष्टकऱ्यांच्या मुलींनी ९० टक्क्यांहून अधिक गुण घेतले असल्याचे पाटील यांनी सांगितले़ शिक्षणात हुशार असणाऱ्या मराठा समाजातील गरीब व होतकरू मुलींसाठी नांदेड शहरात अद्ययावत ग्रंथालय आणि अभ्यासिका सुरू करण्याचे नियोजन जिजाऊ ब्रिगेड करीत असल्याचे त्यांनी सांगितले़ राजश्री मिरजकर, डॉ़ रूपाली माने यांनी स्पर्धा परीक्षेत समाजातील मुला- मुलींची संख्या वाढविण्यासाठी ेप्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगितले़ प्रास्ताविक डॉ़ प्रतिमा डोणगे, डॉ़ मनोरमा पाटील चव्हाण यांनी केले़ यशस्वीतेसाठी सुशीला मनूरकर, रंजना नरवाडे पाटील, ममता माने, जयश्री भायेगावकर, सविता पावडे, देवराये आदींनी परिश्रम घेतले़ यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या़ (प्रतिनिधी)