शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

चीनच्या विकासाचे प्रतिबिंब येथेही उमटवू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 01:02 IST

औरंगाबाद : चीनमधील चेंगडू आणि ड्युनहाँग शहरांमध्ये विकासाची अनेक कामे करण्यात आली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : चीनमधील चेंगडू आणि ड्युनहाँग शहरांमध्ये विकासाची अनेक कामे करण्यात आली आहेत. या कामांचे प्रतिबिंब ऐतिहासिक औरंगाबाद शहरातही उमटणार असल्याचे मत महापौर बापू घडमोडे व त्यांच्यासोबत गेलेल्या शिष्टमंडळाने एका पत्रकार परिषदेत व्यक्त केले. चीनमधील चकचकीत आणि उच्च दर्जाच्या रस्त्यांची बांधणी, कचऱ्यावर प्रक्रिया करून राख तयार करण्याची कामेही औरंगाबादेत राबविण्याचा मानस शिष्टमंडळाने व्यक्त केला.सहा दिवसांच्या दौऱ्यावर सोमवारी मनपाचे शिष्टमंडळ शहरात दाखल झाले. मंगळवारी दुपारी महापौर बापू घडमोडे, माजी उपमहापौर प्रमोद राठोड, माजी सभागृहनेते राजेंद्र जंजाळ, नगरसेवक कचरू घोडके, आयुक्त डी.एम. मुगळीकर यांनी चीन दौऱ्याची सविस्तर माहिती दिली. चेंगडू या शहरात एका खाजगी कंपनीच्या सहकार्याने घनकचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येते. दररोज २,४०० टन कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून राख तयार करण्यात येते. या राखेपासून विटा तयार करण्यात येतात. अवघे ७५ कर्मचारी हा संपूर्ण प्रकल्प अत्याधुनिक पद्धतीने हाताळतात. औरंगाबादेत दररोज ५०० टन कचरा जमा होतो. येथे हा प्रकल्प राबविण्यासाठी खर्चही कमी येईल, संबंधित कंपनीशी प्राथमिक बोलणे झाले आहे. चेंगडू शहरातील रस्त्यांचा दर्जा पाहून महापालिकेचे शिष्टमंडळ अवाक् झाले. कुठेच कचऱ्याचा कणही दिसून येत नाही. कमी जागेत सुंदर दुभाजक, प्रत्येक प्रमुख रस्ता किमान सहा पदरी ठेवण्यात आला आहे. सायकल ट्रॅक, दुचाकीसाठी वेगळी लाईन, चारचाकीसाठी वेगळी लाईन असते. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही डोळे दिपवणारी असल्याचे यावेळी शिष्टमंडळाने नमूद केले. पांडा सफारी पार्कची योजना औरंगाबादेतही राबविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. ड्युनहाँग शहर वाळवंटी प्रदेश आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी अप्रतिम योजना आखण्यात आल्या आहेत.येथील वाळूतून संगीत निघते, असे मार्केटिंग करण्यात आले असून, पॅराग्लायडिंग, हेलिकॉप्टरद्वारे हवाई सफरही घडविण्यात येते. वाळवंटातही पाण्याची नदी आणण्यात आली आहे. याच भागात इ.स. ८ व्या शतकातील गौतम बुद्धांच्या मूर्ती आहेत. ३२ आणि २३ फुटी मूर्ती पर्यटकांचे आकर्षण केंद्र आहेत.नागरिकांमध्ये देशाबद्दल प्रचंड आस्थाचीनमधील प्रत्येक नागरिकाला आपल्या देशाबद्दल प्रचंड आस्था आहे. देशप्रेमाने भारावलेल्या या मंडळींनी भारतातील कोणत्याही शहरापेक्षा १०० वर्षे पुढील विकास करून ठेवला आहे. त्याची तुलना अजिबात होऊ शकत नाही. तंत्रज्ञानातही या देशाने गगनभरारी घेतली आहे. दुसऱ्या देशाचे कोणतेच तंत्रज्ञान त्यांना मान्य नाही. त्यांनी स्वत:चे तंत्रज्ञान विकसित केले आहे.