प्रताप नलावडे , बीडजिल्ह्यातील सहा आमदारांमध्ये गेल्या चार वर्षात सर्वात जास्त विकासनिधीचा वापर करण्यामध्ये गेवराईचे आमदार बदामराव पंडित व परळीच्या आ. पंकजा पालवे-मुंडे सर्वात पुढे असून सर्वात कमी विकासनिधीचा वापर बीडचे आमदार तथा पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर व केजचे आ. पृथ्वीराज साठे यांनी केल्याचे दिसून येत आहे. अखर्चित निधी शासनाच्या तिजोरीत परत गेला आहे़ विधानसभा निवडणुका उंबरठ्यावर आणि अपुरा वेळ यामुळे हाती असलेला निधी इच्छा असूनही खर्च करता येणार नाही़आष्टीचे आमदार व विद्यमान राज्यमंत्री सुरेश धस यांनी २०१०-११ या आर्थिक वर्षात दीड कोटीच्या विकास निधीपैकी एक कोटी ४० लाख रुपये म्हणजेच ९३.६७ टक्के इतकी रक्कम खर्च केली. २०११-१२ या आर्थिक वर्षात दोन कोटी रक्कमेपैकी एक कोटी ६५ लाख रुपये म्हणजेच ८२.५० टक्के इतकी रक्कम खर्च केली. २०१२-१३ या आर्थिक वर्षात दोन कोटी पैकी ७० लाख ५० हजार रुपये म्हणजेच अवघी ३५ टक्के रक्कमच विकास कामांवर खर्च झाली. २०१३-१४ मध्ये शासनाकडून वितरित तीन कोटी २४ लाख ३६ हजार रुपयांपैकी दोन कोटी ९० लाख रुपये म्हणजेच ८९.५१ टक्के रक्कम खर्च झाली. केजआ. पृथ्वीराज साठे यांनी २०१०-११ मध्ये दीड कोटी रुपयांच्या विकास निधीपैकी एक कोटी २८ लाख रुपये खर्च करीत ८५.३३ टक्के रक्कम उपयोगात आणली. २०११-१२ मध्ये दोन कोटीच्या विकास निधीपैकी एक कोटी ८२ लाख ५० हजार रुपयांचा खर्च करीत त्यांनी विकास कामांवर एकूण रकमेच्या ९१.२५ टक्के इतकी रक्कम उपयोगात आणली. २०१२-१३ मध्ये दोन कोटी पैकी एक कोटी ५४ लाख खर्च करीत ७७.१५ टक्के इतकी रक्कम विकास कामांवर खर्च केली. २०१३-१४ मध्ये दोन कोटी ५६ लाख रुपयांपैकी केवळ ९८ लाख १४ हजार रुपयांचा (३८.३३ टक्के) खर्च विकास कामांवर करण्यात आला़परळीपरळी मतदार संघाच्या आ. पंकजा पालवे-मुंडे यांनी २०१०-११ या आर्थिक वर्षात दीड कोटी रुपयांच्या विकास निधीपैकी सर्वच्या सर्व रक्कम विकास कामांसाठी खर्च करीत शंभर टक्के रकमेचा उपयोग केला. २०११-१२ मध्ये दोन कोटी पैकी दोन कोटी रुपये खर्च करीत या आर्थिक वर्षातही त्यांनी शंभर टक्के रक्कम उपयोगात आणली. २०१२-१३ या आर्थिक वर्षात एक कोटी ५४ लाख ६७ हजार रुपये खर्च करीत एकूण रकमेच्या ७७.३४ टक्के रक्कम त्यांनी विकासकामांवर खर्च केली. २०१३-१४ मध्ये दोन कोटी २३ लाख रुपयांपैकी एक कोटी ५२ लाख ८६ हजार रुपये म्हणजेच ६८.५० टक्के इतकी रक्कम खर्च केली. माजलगावआ. प्रकाश सोळंके यांनी २०१०-११ मध्ये दीड कोटीच्या विकास निधीपैकी एक कोटी ३५ लाख रुपये खर्च केले. एकूण रकमेच्या ९०.३३ टक्के रक्कम त्यांनी उपयोगात आणली. २०११-१२ या आर्थिक वर्षात त्यांनी दोन कोटीच्या विकास निधीपैकी एक कोटी ९६ लाख इतकी रक्कम उपयोगात आणली. ती, एकूण रकमेच्या ९८.०२ टक्के होय. २०१२-१३ मध्ये दोन कोटी पैकी एक कोटी ३३ लाख म्हणजेच ६६.६२ टक्के रक्कम खर्च केली. २०१३-१४ मध्ये दोन कोटी ६८ लाखांपैकी निम्मे म्हणजेच एक कोटी ३९ लाख रुपये त्यांनी विकास कामांवर खर्च केले. एकूण रकमेच्या ५१,८० टक्के रक्कम त्यांनी उपयोगात आणली.बीडबीड जिल्ह्यातील सहा आमदारांनी गेल्या तीन वर्षात त्यांच्या विकासनिधीचा किती आणि कसा वापर केला याचा आढावा घेतला. २०१०-११ या आर्थिक वर्षात सहाही आमदारांना प्रत्येकी दीड कोटी रूपयांचा विकासनिधी मंजूर करण्यात आला होता. यापैकी बीड जिल्ह्याचे आमदार आणि पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी एकूण दीड कोटी रूपयांपैकी विकासकामावर ८९.४२ लाख रूपये खर्च केले. २०११-१२ मध्ये विकास निधीची रक्कम दोन कोटी इतकी करण्यात आली. यावेळी क्षीरसागर यांनी विकास कामांवर एक कोटी ४२ लाख इतका खर्च केला. एकूण रकमेच्या ७१ टक्के रक्कम त्यांनी खर्च केली. २०१२-१३ मध्ये ५७ लाख रुपये विकास कामांवर खर्च केले. एकूण रकमेच्या २८ टक्के इतकीच रक्कम त्यांनी या वर्षात वापरली. २०१३-१४ मध्ये अपूर्ण व नवीन कामावरील खर्च २ कोटी ११ लाख रुपये केला. या आर्थिक वर्षात मंजूर झालेल्या अनुदानापैकी त्यांनी ५७.८० टक्के इतकी रक्कम खर्च केली.गेवराईगेवराई मतदार संघाचे आ. बदामराव पंडित यांनी २०१०-११ या आर्थिक वर्षात मंजूर दीड कोटी पैकी एक कोटी १३ लाख खर्च करीत ७५.३३ टक्के रक्कम खर्च केली. २०११-१२ या वर्षात विकासनिधीची रक्कम दोन कोटी होती, त्यापैकी एक कोटी ९५ लाख रुपये खर्च करीत ९७.५० टक्के रकमेचा वापर त्यांनी विकास कामांसाठी केला. २०१२-१३ या आर्थिक वर्षात एक कोटी ८० लाख इतकी रक्कम खर्च करीत त्यांनी एकूण रकमेच्या ९० टक्के रक्कम उपयोगात आणली. २०१३-१४ या आर्थिक वर्षात विकास कामासाठी त्यांनी दोन कोटी १७ लाख रुपये मंजूर झाले. त्यापैकी दोन कोटी १० लाख २२ हजार रुपये खर्च झाले. एकूण रकमेच्या ९६.७० टक्के रक्कम त्यांनी विकास कामांसाठी वापरली. उद्घाटनांची लगीनघाईवर्षकमी खर्चअधीक खर्च२०१०-११५९.६१ आ.क्षीरसागर१००% आ. पालवे२०११-१२७१ टक्के आ. क्षीरसागर१००% आ. पालवे२०१२-१३२८ टक्के आ.क्षीरसागर९८% आ.बदामराव पंडित२०१३-१४३८.३३ आ.साठे९६.७० आ.बदामराव पंडितविधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर आल्या आहेत़ त्यामुळे निवडणुकीपूर्वी विकास कामे करण्यावर लोकप्रतिनिधी भर देऊ लागले आहेत़ चार वर्षे लोटल्यानंतर आता उशिराने उद्घाटनांची लगबग सुरु असल्याचे चित्र जिल्हाभरात पहावयास मिळत आहे़ काही आमदार आपापल्या मतदारसंघात तळ ठोकून आहेत़
होऊ द्या की खर्च़!
By admin | Updated: July 24, 2014 00:09 IST