शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

चिखल, दगड, लिंबोळीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना धडे..!

By admin | Updated: February 27, 2017 00:24 IST

उमरगा : चिखल, दगड, लिंबोळी, गजगे, बिया, गोट्या आदी सहज उपलब्ध होणाऱ्या घटकांचा शैक्षणिक साहित्य म्हणून वापरण्याची संकल्पना शिक्षिका उषा गाडे-इंगळे यांनी यशस्वी केली आहे़

उमरगा : चिखल, दगड, लिंबोळी, गजगे, बिया, गोट्या आदी सहज उपलब्ध होणाऱ्या घटकांचा शैक्षणिक साहित्य म्हणून वापरण्याची संकल्पना तालुक्यातील जवळगाबेट येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सहशिक्षिका उषा गाडे-इंगळे यांनी यशस्वी केली आहे़ या संकल्पनेतून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसह शाळेतील उपस्थितीही शंभर टक्के झाली आहे़चिखलात खेळायला लहान मुलांना आवडते. तसेच दगड, गोट्या, लिंबोळी, गजगे, चिंचोके यांच्यासोबत खेळायलाही त्यांना वेगळाच आनंद मिळतो़ नेमकी ही गोष्ट हेरून उषा गाडे - इंगळे यांनी वरील साहित्याचा शैक्षणिक साहित्य म्हणून उपयोग करण्याचा संकल्प केला़ चिखलातून चौकोन, आयत, त्रिकोण, वर्तुळ, अपूर्णांक आणि वेगवेगळे आकार या संकल्पना तिसरी - चौथीचे विद्यार्थी शिकले. छोटे-छोटे दगड, गोट्या, गजगे, बिया, लिंबोळी, चिंचोके यांचा वापर करून बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या क्रिया विद्यार्थी सहजपणे करीत आहेत़ ज्ञानरचनावादावर आधारित प्रत्यक्ष अनुभव शिक्षण देण्याचे काम या उपक्रमातून साध्य झाले़ विशेष म्हणजे या शैक्षणिक साहित्याला कसलाही खर्च आला नाही. भरमसाठ पैसे खर्चून तयार केलेले रंगीबेरंगी शैक्षणिक साहित्य अनेकदा विद्यार्थ्यांना भावत नाही. मात्र, ज्या वस्तूंसोबत विद्यार्थी दररोज खेळतात, ज्या वस्तू नेहमी विद्यार्थ्यांच्या खिशात असतात त्याच वस्तूंपासून विद्यार्थ्यांना शिकायला आवडते व ते आनंदाने शिकतात, हे या उपक्रमातून समोर आले आहे़ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभागसहज उपलब्ध होणाऱ्या साहित्याचा शैक्षणिक साहित्य म्हणून वापर सुरू केल्यापासून विद्यार्थी गणिती क्रिया वेगाने करू लागले आहेत़ यामुळे विद्यार्थ्यांच्या गणिती संकल्पना स्पष्ट झाल्या आहेत़ वर्ग शंभर टक्के प्रगत झाला असून, विद्यार्थी पूर्णवेळ शाळेत थांबत असल्याचे उषा गाडे यांनी सांगितले़ (वार्ताहर)