शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांनी मौन सोडले पण कारवाईवर भाष्य टाळलं; "मारहाणीची घटना अत्यंत गंभीर, दुर्दैवी..."
2
ऑपरेशन सिंदूरवरून संसदेत गोंधळ, कामकाज स्थगित; पहलगाम हल्ल्याचे दशतवादी, ट्रम्प दावा मुख्य मुद्दे... 
3
७/११तील सर्व दोषी निर्दोष, सरकारसमोर कोणते पर्याय; पुढे काय होणार? कायदेतज्ज्ञ म्हणतात...
4
अजित पवारांविरोधात छावा संघटना आक्रमक; NCP कार्यालयावर दगडफेक, जाळण्याचाही प्रयत्न
5
ट्रम्प यांच्या धोरणाचा आता 'नासा'लाही फटका; 'या' कारणांमुळे उपग्रह काढले विक्रीला, तेही डिस्काउंटमध्ये?
6
IND vs PAK : या भारतीय क्रिकेटरचं नाव घेत शाहिद आफ्रिदीनं केला मोठा दावा, म्हणाला...
7
७/११तील दोषींची निर्दोष मुक्तता, उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने...”
8
मुंबई: कुत्रा लचके तोडत होता आणि मालक हसत होता; घाटकोपरमध्ये ११ वर्षाच्या मुलावर पिटबुलचा हल्ला
9
नवी मुंबईत भाजपा आमदारानं मनसेला डिवचलं; मराठी भाषेत लावलेली पाटी काढून गुजरातीत लावली
10
“शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पळाले”; संजय राऊतांचा दावा, सरकारवर टीका
11
आता ATM मधून पैसे काढायला कार्डची गरज नाही! 'या' सोप्या पद्धतीने UPI द्वारे काढा कॅश
12
झोपेच्या गोळ्या, शॉक दिला... बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याचा काढला काटा, कुटुंबाने केली 'ही' मागणी
13
नेपोकिड्सचा दाईजान! 'सैय्यारा'चं कौतुक केल्यावर करण जोहर झाला ट्रोल, उत्तर देत म्हणाला...
14
पहिल्या तिमाहीचे निकाल, बोनस आणि डिविडेंडची घोषणा; 'या' बँकेचा शेअर चमकला, तुमच्याकडे आहे?
15
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये लष्कराने लक्ष्य साध्य केले, जगाने भारताची ताकद पाहिली'; अधिवेशनाआधी पीएम मोदी म्हणाले...
16
अमेरिका-भारत व्यापार कराराकडे बाजाराचे लक्ष; तिमाही निकाल आणि परकीय गुंतवणुकीचा कस
17
IND vs ENG : टीम इंडियात नव्या चेहऱ्याची एन्ट्री; या पठ्ठ्यानं एका डावात अख्खा संघ केला होता गारद
18
Mumbai Bomb Blast 2006: शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष
19
रेअर अर्थ मॅग्नेट्सवर चीनची 'धक्कादायक' खेळी! जगभरातील कारखान्यांचा जीव भांड्यात, नेमकं काय केलं?
20
Anthem Biosciences Ltd IPO: जबरदस्त लिस्टिंग! पहिल्याच दिवशी प्रत्येक शेअरवर ₹१५३ चा फायदा; ₹७४० पार पोहोचला भाव, गुंतवणूकदार मालामाल

चित्रपट शौकिनांची पाठ; पडद्यावरच्या सिनेमागृहांवर पडला पडदा !

By admin | Updated: February 3, 2015 00:58 IST

समीर सुतके ,उमरगा सुमारे आठ वर्षापूर्वी जिल्ह्यात सात कायमस्वरुपी चित्रपटगृहे होती. उमरग्यात सर्वाधिक तीन चित्रपटगृहे असल्याने या परिसरात हिंदी-मराठी चित्रपटांचा शौकिनही मोठा होता

समीर सुतके ,उमरगासुमारे आठ वर्षापूर्वी जिल्ह्यात सात कायमस्वरुपी चित्रपटगृहे होती. उमरग्यात सर्वाधिक तीन चित्रपटगृहे असल्याने या परिसरात हिंदी-मराठी चित्रपटांचा शौकिनही मोठा होता. मात्र मागील काही वर्षात घराघरात दूरदर्शन संच येऊन २४ तास चित्रपटांचा रतीब सुरू झाल्यानंतर उस्मानाबाद वगळता जिल्ह्यातील पडद्यावरचा सिनेमाही पडद्याआड गेला आहे. विशेष म्हणजे उमरग्यातील तीनही चित्रपटगृहांना आता टाळे लागले असून, या इमारतीचा वापर आता मंगल कार्यालये, गोडाऊनसाठी होत असल्याचे चित्र आहे. जुन्या चित्रपटांचा नाद असलेल्या अनेक पिढ्या आहेत. त्यांच्यासाठी शहरातील ही चित्रपटगृहे आज केवळ आठवणीपुरतीच उरली आहेत. महामार्गामुळे उमरग्यात शहरासह विविध भागातून नागरिकांचा राबता असतो. हैदराबादकडे जाणाऱ्या अनेक मालट्रकांवरील चालक व क्लिनर पूर्वी उमरग्यात थांबून हमखास चित्रपटाचा आनंद लुटायचे. मात्र एका पाठोपाठ चित्रपटगृहे बंद पडली. २००८ मध्ये जिल्ह्यातील वाशी येथे एक चित्रपटगृह होते. त्याची आसनक्षमता ४५० होती. उस्मानाबादेत दोन चित्रपटगृहांची आसनक्षमता १०१२ होती. तर उमरग्यातील चार चित्रपटगृहांची आसन क्षमता सुमारे २१०० होती. आजघडीला उमरग्यातील चार चित्रपटगृहांसह वाशी येथील थिएटरही बंद पडले आहे. केवळ चित्रपटगृहेच बंद पडली, असेही नाही. घराघरात पोहोचलेल्या टीव्ही संचाने व्हीडीओ सेंटरचेही दरवाजे बंद केले. २००८ मध्ये परंडा शहरात दोन, भूम तालुक्यात सात, वाशी येथील एक, कळंब तालुक्यात चार तर उस्मानाबादेतील २५ व तुळजापूरमधील दहा तर लोहारा शहरात पाच व्हीडीओ सेंटर होते. जिल्ह्यातील या ५२ व्हीडीओ सेंटरची आसन क्षमता २६९० होती. सद्यस्थितीत जिल्ह्यात केवळ ११ व्हीडीओ सेंटर सुरू असून त्यांची आसन क्षमता अवघी ३३० इतकी खाली आली आहे. सद्यस्थितीत परंडा २, भूम १, कळंब १, उस्मानाबाद ३, तुळजापूर व लोहाऱ्यात प्रत्येकी २ व्हिडीओ सेंटर सुरू आहेत. तर वाशी व उमरगा येथे एकही व्हिडीओ सेंटर सुरू नसल्याचे दिसून येते. कौटुंबिक व धार्मिक चित्रपटांची संख्या कमी झाली. त्यामुळे स्त्रियांसह प्रेक्षकांचा मोठा वर्ग थिएटरपासून दूर गेला. त्यानंतर आम्ही डिजीटल सॅटेलाईटद्वारे चित्रपट दाखविण्याचा प्रयत्न केला. मात्र चित्रपटाचे विषय ग्रामीण नसल्याने तो प्रयत्नही फसला. शिवाय डिजीटल सॅटेलाईट सेवा महागडी होती. एकिकडे उत्पन्न कमी होत गेले आणि दुसरीकडे खर्च वाढत गेल्याने १९८२ साली सुरू केलेल्या चित्रपटगृहांना बंद करावे लागल्याचे श्रीराम चित्रपटगृहाचे मालक प्रशांत कुलकर्णी यांनी सांगितले. पूर्वी सर्वत्र हिंदी-मराठी जुन्या चित्रपटांचा मोठा वर्ग होता. विशेषत: कौटुंबिक विषयावर आधारित चित्रपटे पाहण्यासाठी लेकरां-बाळांसह संपूर्ण कुटुंब थिएटरमध्ये जायचे. मात्र कौटुंबिक चित्रपटांची संख्या कमी होत गेली. त्याच सुमारास घराघरात टीव्ही पोहोचली. आणि मग अनेकांनी या चित्रपटगृहांकडे पाठ फिरविली. चित्रपटगृहांचा खर्चही भागेना झाल्यानंतर आर्थिक गणित बिघडल्याने उमरग्यातील एक-एक चित्रपटगृह बंद पडत गेले. १९६५ साली उदयभानू पाटील यांनी राजश्री चित्रपटगृह सुरू केले. या थिएटरमध्ये संपूर्ण रामायण, जय संतोषी माँ, आई तुझे थोर उपकार हे सिनेमे शंभर पेक्षा अधिक दिवस चालले. त्यामुळे या थिएटरला चित्रपट महामंडळाचा पुरस्कारही मिळाला होता. प्रशांत कुलकर्णी यांनी सुरू केलेल्या श्रीराम चित्रमंदिरची स्थापना १९८२ ची. साधारणत: सन २००० पर्यंत हे थिएटर सुरू होते. मात्र त्यानंतर यालाही टाळे लागले. शिवाजीराव मोरे यांनी १९९० मध्ये श्रीगणेश चित्रपटगृहाची स्थापना केली होती. किशन कन्हैय्या हा चित्रपट या टॉकीजमधील पहिला चित्रपट होता. तर माहेरची साडी या चित्रपटाने या थिएटरमध्ये १०० दिवस पूर्ण केले होते. मात्र हे थिएटरही आजघडीला बंद पडले आहे. उमरग्यात सर्वप्रथम म्हणजे १९६५ साली राजश्री चित्रपटगृह सुरू केले होते. मात्र कालांतराने चित्रपटाचे विषय आणि प्रेक्षकांच्या आवडी बदलत गेल्याने चित्रपटगृहाकडे सिनेरसिकांनी पाठ फिरविली. टीव्हीबरोबरच केबलचाही फटका बसला. त्यातच शासकीय कर, वाढते वीज बिल, कर्मचाऱ्यांचे पगार या बाबी वाढत गेल्याने नाइच्छेनेच आम्हाला चित्रपटगृह बंद करावे लागले. मात्र त्यावेळच्या सिनेरसिकांची आजही आठवण कायम आहे. अनेक रसिक एकच चित्रपट अनेकवेळा आवर्जून पाहायचे, असे राजश्री चित्रपटगृहाचे मालक उदयभानू पाटील यांनी सांगितले.