शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणाच्या पटावरही मुलींची संख्या मुलांपेक्षा कमी !

By admin | Updated: January 2, 2017 23:57 IST

लातूर कायद्याचा धाक आणि मुली जन्माच्या स्वागताची जनजागृती झाली असली, तरी जन्मदराचा टक्का सुधारण्याचे नाव घेत नाही.

आशपाक पठाण लातूरकायद्याचा धाक आणि मुली जन्माच्या स्वागताची जनजागृती झाली असली, तरी जन्मदराचा टक्का सुधारण्याचे नाव घेत नाही. परिणामी, पहिली ते बारावीच्या हजेरीपटावरही मुलींपेक्षा मुलांची संख्या सर्वाधिक आहे. मुलांचा पट ६९ टक्क्यांचा असून, मुलींचा पट केवळ ३१ टक्के आहे. नर्सरीत ‘ए, बी, सी, डी’ मुलांना ओळख करुन देणाऱ्या रणरागिणी असल्या तरी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाच्या ज्ञानदानात पुरुष शिक्षकांचीच संख्या जास्त आहे. स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त घेतलेला हा आढावा.‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’, ‘लेक वाचवा,’ आदी माध्यमातून मुलींच्या जन्माचा टक्का वाढविण्यासाठी शासन प्रयत्न करीत असले, तरी अजूनही शिक्षण, नोकरी आदी क्षेत्रांत महिलांचा टक्का कमीच आहे. लातूर जिल्ह्यात पहिली ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या ५ लाख ६९ हजार ५६६ एवढी आहे. शैक्षणिक वर्ष २०१५-१६ च्या या विद्यार्थी संख्येत मुलींचे प्रमाण २ लाख ५६ हजार ३९५ आहे, तर मुलांची संख्या ३ लाख १३ हजार १७१ एवढी आहे. पहिली ते सातवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मुलींचे प्रमाण अधिक असते. त्यानंतर मात्र विविध कारणांमुळे शिक्षण सोडणाऱ्या मुलींची संख्या आजही लक्षणीय आहे. उच्च शिक्षणात मुलींचा टक्का अल्पच आहे. मुलींना शिक्षणाचा अधिकार देत पहिली शाळा सुरू करून ज्ञानदानाचे काम करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या कार्यातून मार्गक्रमण करणाऱ्या सावित्रीच्या लेकींची विविध क्षेत्रातील पिछेहाट हा चिंतनाचा विषय आहे. पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे धडे देणाऱ्या शिक्षकांमध्ये महिला शिक्षिकेचे प्रमाण केवळ २१ टक्के आहे. १९ हजार ९२५ शिक्षकांमध्ये स्त्रियांची संख्या ५ हजार २८३ इतकी आहे. प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांना ज्ञानदान करणाऱ्या महिला शिक्षिकांची संख्या कमी असली, तरी मुलांमध्ये बालवयात शिक्षणाची गोडी निर्माण करण्याचे कार्य नर्सरीत (अंगणवाडी, बालवाडी) केले जाते. या ठिकाणी मात्र ९५ टक्क्यांहून अधिक महिला ज्ञानदानाचे काम करीत आहेत. एकूणच मुलांवर मुख्य संस्काराचा भाग असलेल्या बालवयात स्त्रियाच शिक्षणाची बीजे रोवत असल्याचे दिसत आहे.