शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

लिंबू, मिरचीचे भाव गगनाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2016 00:58 IST

राजेश खराडे , बीड अत्यल्प पावसाचा परिणाम आता फळ पिके आणि भाजीपाल्यांवरही जाणवू लागला आहे. उन्हाची दाहकता वाढताच पालेभाज्यांची आवक घटली आहे,

राजेश खराडे , बीडअत्यल्प पावसाचा परिणाम आता फळ पिके आणि भाजीपाल्यांवरही जाणवू लागला आहे. उन्हाची दाहकता वाढताच पालेभाज्यांची आवक घटली आहे, शिवाय लिंबू या फळपिकाचेही दरवर्षीप्रमाणे यंदाही भाव गगनाला भिडले आहे. किलोवर विक्रीवर होणारे लिंबू आता नगावर आले आहे, तर मिरचीही शंभर रूपये किलोप्रमाणे विकली जात आहे.अवघ्या पंधरा दिवसांपूर्वी सर्व भाजीपाल्यांचे दर मध्यम स्वरूपाचे होते. उन्हाची तीव्रता वाढल्याने मिरची, गवार, वांगे आदींची आवक घटली आहे, तर आष्टी आणि परळी वगळता इतर ठिकाणांहून लिंबाची आवक ठप्प झाली आहे. त्यामुळे ५ रूपयाला एक लिंबू मिळत आहे. जिल्ह्यात लिंबाच्या फळपिकाचे क्षेत्र १ हजार २१० हेक्टर असून, आष्टी तालुक्यात सर्वाधिक म्हणजे ८६० एवढे आहे, तर त्यापाठोपाठ परळी तालुक्यात १५० हेक्टरवर लागवड आहे.सर्वत्र कागदी लिंबे घेतली जात आहेत. दरवर्षी उन्हाळ्याच्या मध्यावर लिंबाचे भाव वाढत असतात; मात्र यंदा उन्हाळा सुरू होताच भाव कडाडले आहेत. जागोजागी वाढलेले रसवंतीगृह, शीतपेय दुकानांमुळे लिंबाची मागणी वाढत आहे. येथील खासबागेतील आडत मार्केटमध्ये लिंबू फळपीक दाखल होण्यापूर्वीच व्यापाऱ्यांनी त्याची ‘अ‍ॅडव्हान्स बुकिंग’ केली असल्याचे पाहावयास मिळाले आहे.दुसरीकडे मिरचीची लागवड ७५० हेक्टर असून, पाण्याअभावी हिरव्या मिरच्यांच्या भावाने शतक गाठले आहे, तर वाळलेल्या मिरच्या दोनशे रूपये किलोप्रमाणे विकल्या जात आहेत.उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पालेभाज्या आणि फळपिकांचे दर वाढले असून, आगामी काळातही यामध्ये भर पडणार असल्याचे येथील व्यापारी दिनकर काळे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.