लोकमत न्यूज नेटवर्कसोनपेठ : राज्यातील दलित, आदिवासी, ओबीसी अल्पसंख्यांक यासह भटक्या विमुक्त जातीतील समाजबांधवांनी विविध महामंडळांकडून घेतलेले कर्ज माफ करावे, या मागणीसाठी लालसेनेचे संस्थापक कॉ. गणपत भिसे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी येथील तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. दलित समाजाचे १० लाख रुपयांचे कर्ज माफ करावे, कर्ज प्रकरणी निवड समिती रद्द करावी, कर्जासाठी सरकारी जामीनदाराची अट रद्द करावी, एनएसएफ डीसी ही योजना पुन्हा सुरू करावी, गायरान जमीन विनाअट नावे करावी, मागासवर्गीय शिष्यवृत्ती प्रतिमहा २ हजार रुपये करावी आदी मागण्यांसाठी कॉ. गणपत भिसे यांच्या नेतृत्वाखाली लालसेनेने तहसील कार्यालयासमोर निदर्शने केली. यानंतर प्रशासनाला आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. कॉ. गणपत उफाडे, मराठवाडा सरचिटणीस कॉ. ज्ञानेश्वर मोरे, सरपंच ज्ञानेश्वर मव्हाळे, कॉ. आश्रोबा उफाडे, दत्ता तांबे, राम मेंडके, शेख निसार, अंकूश पवार, भगवान कांबळे, कोंडिबा कांबळे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
सोनपेठ येथे लालसेनेची निदर्शने
By admin | Updated: July 6, 2017 23:51 IST