शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

एलईडी पथदिव्यांचा प्रस्ताव बारगळला...!

By admin | Updated: May 20, 2017 00:50 IST

जालना :कंपनीच्या करारातील अटी, वीज बिलाची थकबाकी भरण्याबाबत उदासीन असलेली पालिका या कारणांमुळे एलईडी पथदिव्यांचा प्रस्ताव अखेर बारगळा आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना शहर अंधारमुक्त करण्यासाठी नगरपालिकेने मोठा गाजावाजा करून एनर्जी इफिशियंसी सर्व्हिसेस लिमीटेड कंपनीमार्फत एलईडी पथदिवे बसविण्याचे नियोजन केले. लोकप्रतिनिधींचा हस्ते या कामाचे अधिकृत उदघाटनही झाले. मात्र, कंपनीच्या करारातील अटी, वीज बिलाची थकबाकी भरण्याबाबत उदासीन असलेली पालिका या कारणांमुळे एलईडी पथदिव्यांचा प्रस्ताव अखेर बारगळा आहे. महावितरणचे चौदा कोटींचे वीज बिल थकल्यामुळे शहरातील पथदिवे अनेक वर्षांपासून बंद आहेत. अभय योजनेचा लाभ घेत पालिकेने तीन टप्प्यांत पाच कोटींचे वीजबिल भरले असले तरी पालिकेकडे अद्याप दहा कोटींची थकबाकी आहे. असे असताना शहरातील बंद पथदिवे पुन्हा सुरू करणे व वीज बिलात बचत करण्यासाठी पालिकेने एनर्जी इफिशियंसी सर्व्हिसेस दिल्ली या कंपनीमार्फत शहरात नवीन तेरा हजार एलईडी दिवे बसविण्याचे नियोजन केले. सप्टेंबर २०१६ मध्ये पालकमंत्री बबनराव लोणीकर, माजी आ. कैलास गोरंट्याल यांच्या उपस्थितीत मामा चौकातून एलईडी दिवे बसविण्याच्या कामास सुरूवात झाली. मात्र, तीनशे पथदिवे बसविल्यानंतर कंपनीने पालिकेच्या अधिकाऱ्यांसमोर करारनामा ठेवला. करारनाम्यात एलईडी दिवे बसविल्यानंतर वीज बिलात होणारी बचत इइएसएल कंपनीला अनामत म्हणून देण्यात यावी. एलईडी दिव्यांची सात वर्षे देखभाल दुरुस्तीच्या खर्चासह अन्य अटींचा समावेश आहे. इइएसएल कंपनीच्या या अटींना नगरपालिकेने सकारात्मक प्रतिसाद न दिल्यामुळे कंपनीने शहरात एलईडी पथदिवे बसविण्याचे काम थांबविले. त्यामुळे शहरात अंधाराचे साम्राज्य कायम आहे. परिणामी नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.