शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सीना कोळेगावमधून भोत्रा बंधाऱ्यात पाणी सोडणार

By admin | Updated: May 16, 2017 00:06 IST

उस्मानाबाद/परंडा : पीकांना उन्हाळी हंगामात सिंचन उपलब्ध व्हावे यासाठी सीना कोळेगाव प्रकल्पातून भोत्रा को. प. बंधाऱ्यात ३.५ दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला

लोकमत न्यूज नेटवर्कउस्मानाबाद/परंडा : पीकांना उन्हाळी हंगामात सिंचन उपलब्ध व्हावे यासाठी सीना कोळेगाव प्रकल्पातून भोत्रा को. प. बंधाऱ्यात ३.५ दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्याचा निर्णय सोमवारी पालकमंत्री दिवाकर रावते यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.पालकमंत्री श्री. रावते यांच्या प्रमुख उपस्थितीत सिना कोळेगाव प्रकल्पाच्या कालवा सल्लागार समितीची सोमवारी मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीस बीड लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधिक्षक अभियंता सुनंदा जगताप, भूमच्या उपविभागीय अधिकारी अर्चना नष्टे, उस्मानाबाद पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सु. म. जगताप, परंड्याचे उपविभागीय अभियंता प्रकाश देवकते, दीपक सरतापे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. हे पाणी सोडताना थकबाकीदार परवानाधारकांकडून तातडीने थकबाकी वसुल करावी. सोडण्यात आलेल्या पाण्याचा लाभ फक्त परवानाधारक शेतकरीच घेतील यादृष्टीने कार्यवाही करावी. तसेच नदीपात्रात बेकायदेशीर वीजपंप लावून पाणीउपसा करणाऱ्यांवर कारवाई करावी अशा सुचनाही यावेळी पालकमंत्री रावते यांनी दिल्या. सीना कोळेगाव प्रकल्पात ११ मे २०१७ रोजी एकूण ७७.१२ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा उपलब्ध आहे.यापैकी उपयुक्त पाणीसाठा हा २.८२ दलघमी तर मृत पाणीसाठा हा ७४.३० दलघमी इतका आहे, अशी माहिती या बैठकीत पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. सिना कोळेगाव धरणातून भोत्रा को. प. बंधाऱ्यामध्ये उर्वरीत उन्हाळी हंगामासाठी ३.५० दलघमी पाणी सोडण्याची मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे. उन्हाळी हंगामात शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व्हावी यासाठी धरणातून भोत्रा बंधाऱ्यामध्ये ३.५० दलघमी पाणी सोडण्यास मान्यता देण्यात आली. पालकमंत्री रावते यावेळी म्हणाले की, हे पाणी सोडल्यानंतर पाणीचोरी होणार नाही यादृष्टीने कार्यवाही करण्यात यावी.