शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

जायकवाडीतून कोणत्याही क्षणी पाणी सोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 21:27 IST

जायकवाडी ात ८७.६१ टक्के साठा झाला आहे. भारतीय हवामान खात्याने १७ ते २१ सप्टेंबरदरम्यान कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाठा व विदर्भात अतिवृष्टीचा अंदाज वर्तविला असून तो खरा ठरल्यास जायकवाडीतून कोणत्याही क्षणी पाणी सोडण्यात येईल, असा इशारा सोमवारी जायकवाडी प्रशासनाने दिला आहे.

ठळक मुद्देधरणात ८७.६१ टक्के साठा

पैठण (जि. औरंगाबाद) :  जायकवाडी ात ८७.६१ टक्के साठा झाला आहे. भारतीय हवामान खात्याने १७ ते २१ सप्टेंबरदरम्यान कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाठा व विदर्भात अतिवृष्टीचा अंदाज वर्तविला असून तो खरा ठरल्यास जायकवाडीतून कोणत्याही क्षणी पाणी सोडण्यात येईल, असा इशारा सोमवारी जायकवाडी प्रशासनाने दिला आहे.औरंगाबाद शहर व जायकवाडी परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने जायकवाडीच्या जलसाठ्यात  गेल्या २४ तासात जवळपास एक टीएमसीने  वाढ झाली आहे. सोमवारी दिवसभर धरणात १०४१३ क्युसेक क्षमतेने आवक सुरू होती. धरणाचा जलसाठा ८७.६१ टक्के एवढा झाला असून धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आता फक्त सव्वादोन फूट बाकी आहे. यामुळे धरणात मोठ्या क्षमतेने आवक सुरू झाल्यास धरणातून कोणत्याही क्षणी पाणी सोडावे लागणार आहे.१५२२ फूट जलक्षमता असलेल्या जायकवाडीची सोमवारी सायंकाळी पाणीपातळी १५१९.६८ फूट एवढी झाली होती.धरणात एकूण जलसाठा २६४०.२११ दलघमी (९३.२२ टीएमसी) तर जिवंत जलसाठा १९०२.१०५ दलघमी (६७.१६ टीएमसी) एवढा झाला आहे. १ जून २०१७ पासून धरणात ६४.७३ टीएमसी पाण्याची आवक झाली असल्याचे धरण अभियंता अशोक चव्हाण यांनी सांगितले. नाशिक व नगर जिल्ह्यातून येणारी आवक बंद असली तरी स्थानिक पाणलोट क्षेत्रातील पावसाने धरणातील जलसाठ्यात गेल्या १५ दिवसांपासून सातत्याने भर पडत आहे. भारतीय हवाामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पाऊस पडल्यास नाशिक व नगर जिल्ह्यातून धरणात मोठी आवक होण्याची शक्यता आहे. यामुळे जायकवाडी प्रशासन सतर्क झाले आहे. नदीकाठच्या नागरिकांनी दक्षता बाळगावी, असे आवाहन कार्यकारी अभियंता बनसोड व धरण अभियंता अशोक चव्हाण यांनी केले आहे.तहसील प्रशासनाची बैठकसोमवारी पैठणच्या तहसीलदारांनी आपत्ती व्यवस्थापनाची तातडीने बैठक घेतली; परंतु या बैठकीबाबत पत्रकार वा लोकप्रतिनिधी यांना कुठलीच कल्पना दिली नाही. त्यामुळे या बैठकीत काय ठरले, हे समजू शकले नाही.