शहरं
Join us  
Trending Stories
1
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
2
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
3
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
4
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
5
बिहारमध्ये खेळ कोणी पालटला...? ७१.६ टक्के महिलांनी मतदान केलेले, पुरुष बरेच मागे राहिले...
6
ना कंपनी बनवली, ना माल विकला; तरीही रिफंडच्या नावावर सरकारकडून वसूल केले ६४५ कोटी, कसा लावला चुना?
7
बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११८ वर; एवढ्या जागा महागात पडणार...
8
"बिहारमध्ये जो 'गेम' झालाय, तो..."; विधानसभा निवडणुकीच्या निकालावर अखिलेश यादव यांचा टोला
9
Mumbai: बीकॉम विद्यार्थ्याची जबरदस्तीने लिंग बदल शस्त्रक्रिया; ट्रान्सजेंडर टोळीकडून ब्लॅकमेलिंग आणि खंडणी!
10
बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी
11
राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब त्यांच्यावरच फुटला, काँग्रेस-राजदच्या पराभवाची 5 कारणे...
12
आता माणसांचं आयुष्य वाढणार, १५० वर्षांपर्यंत जगणार? चीनचे शास्त्रज्ञ बनवताहेत अँटी एजिंग गोळी
13
ऐकावे ते नवलच! चीनमध्ये माशांना मिरच्या का खायला दिल्या जातायेत?; कारण ऐकून व्हाल हैराण
14
उत्पत्ती एकादशी २०२५: वाळलेले तुळशीचे पानही देईल लाभ, उत्पत्ती एकादशीला करा 'हा' उपाय!
15
घसरत्या बाजारात 'हा' डिफेन्स शेअर चमकला! खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? ब्रोकरेज फर्मने दिलं उत्तर
16
IND vs SA: पंतची विकेटमागून 'बोलंदाजी'! बावुमा कुलदीपच्या जाळ्यात अडकला! (VIDEO)
17
"निवडणूक आयोग आणि SIR जबाबदार...!"; बिहार निवडणूक निकालावरून काँग्रेस भडकली
18
Bihar Election Result: "...यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते"; संजय राऊतांचं निकालावर खळबळजनक विधान
19
बिहारमध्ये विजयी घौडदौड, मात्र पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा फटका; ८ पैकी ६ जागांवर पराभव?
20
बिहारमध्ये एनडीएला बंपर विजय कसा मिळाला? ही आहेत ५ प्रमुख कारणं
Daily Top 2Weekly Top 5

निष्काळजीपणा सोडा; कोरोना वाढला पण सॅनिटायझरचा वापर मात्र घटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 18:37 IST

पोलीस व मनपाच्या कारवाईच्या धाकाने नागरिक मास्क वापरत आहेत. परंतु, हातावर लावण्यासाठी सॅनिटायझरचा वापर मात्र निम्म्याने कमी झाला आहे.

ठळक मुद्दे५० टक्क्याने कमी झाली विक्री नागरिकांमध्ये निष्काळजीपणा वाढत चालला

औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दररोज हजारांचा आकडा पार करत आहे. यापासून धडा घेण्याऐवजी नागरिकांमध्ये दिवसेंदिवस निष्काळजीपणा वाढत आहे. मागील वर्षी सुरुवातीला सॅनिटायझरचा वापर वाढला होता. परंतु, मध्यंतरी रुग्णसंख्या कमी झाली आणि सॅनिटायझरचा खप निम्म्याने कमी झाला. आता रुग्णसंख्या वाढली तरीही सॅनिटायझर वापरण्याला लोक गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून येत आहे.

कोरोनाची दुसरी लाट आल्याचे प्रशासन सांगत आहे. दररोज १ हजारांहून अधिक लोक कोरोना पॉझिटिव्ह सापडत आहेत. दुसरीकडे दवाखान्यात रुग्णांसाठी बेड उपलब्ध नाहीत. अशा परिस्थितीत कोरोना होऊ नये, यासाठी नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक बनले आहे. मात्र, परिस्थिती याउलट दिसत आहे. कोरोनाची लस आल्यानंतर नागरिक आणखी बिनधास्त झाले आहेत. पोलीस व मनपाच्या कारवाईच्या धाकाने नागरिक मास्क वापरत आहेत. परंतु, हातावर लावण्यासाठी सॅनिटायझरचा वापर मात्र निम्म्याने कमी झाला आहे. सॅनिटायझरच्या घाऊक विक्रेत्यानी सांगितले की, मागील वर्षी एप्रिल-मे दरम्यान ५ लीटरचे अडीच ते तीन हजार कॅन विकले जात होते. त्यानंतर औद्योगिक वसाहत सुरू झाली. त्यावेळी ७ हजार कॅनपर्यंत सॅनिटायझरची विक्री वाढली होती. डिसेंबरपासून पुन्हा विक्रीत घट सुरु झाली व ती दीड हजार कॅनवर येवून ठेपली. दुसऱ्या घाऊक विक्रेत्याने सांगितले की, शहरामध्ये महिन्याला १ लाख लीटर सॅनिटायझर विकले जात होते. मात्र, आता फेबुवारी महिन्यात ५० हजार लीटर सॅनिटायझर विकले गेले. एकिकडे कोरोना रुग्णाची संख्या वाढली तर दुसरीकडे सॅनिटायझर खरेदीदारांची संख्या मात्र घटली आहे.

निष्काळजीपणा वाढल्याचा परिणामनागरिकांमध्ये निष्काळजीपणा वाढल्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यात सॅनिटायझर मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे; परंतु विक्री निम्म्याने घटली आहे. विशेष म्हणजे सॅनिटायझरची विक्री शहरात जास्त होत आहे. तुलनेने ग्रामीण भागात १० टक्केच सॅनिटायझरचा वापर केला जात आहे.- नितीन दांडगे, सहसचिव, केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन

वापर झाला कमीसप्टेंबर महिन्यापर्यंत आम्हाला महिनाभरात एक ते दीड लीटर सॅनिटायझर लागत होते. मात्र, नंतर वापर कमी झाल्यामुळे आता महिनाभरात अर्धा लीटर सॅनिटायझर लागते.- प्रसाद दहिवाल, ग्राहक

ग्राहक सॅनिटायझर नाही वापरतआम्ही आमच्या मेडिकलमध्ये सॅनिटायझर ठेवले आहे. मागील वर्षी येणारा प्रत्येक ग्राहक सॅनिटायझर वापरत असे. मात्र, आता १५ ग्राहकांमधून एखादाच ग्राहक सॅनिटायझर घेतो. ग्राहकांना सॅनिटायझर दिले, तरी ते नको म्हणतात.- बद्रीनाथ ठोबरे, औषध व्यावसायिक

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद